Sunday, May 19, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गकणकवलीच्या विकासासाठी २३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर

कणकवलीच्या विकासासाठी २३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णेंनी दिली माहिती

कणकवली (प्रतिनीधी) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाणूनबुजून कणकवली नगरपंचायतला विकासकामांसाठी निधी न देता डावलले जात होते. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने शहराच्या विकासासाठी २३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शहर विकासातील हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केले.

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, किशोर राणे, महेश सावंत, राजू गावणकर आदी उपस्थित होते. यावेळी बंडू हर्णे म्हणाले, कणकवली शहराच्या विविध विकासकामांच्या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शहरातील रस्त्यांकरिता ५ कोटी तसेच नागरी सुविधा योजनेअंतर्गत स्वतंत्रपणे पाच कोटींच्या निधीची यावेळी मागणी केली. नगरपंचायतचा मंजूर असलेल्या ‘स्टाफ पॅटर्न’बाबत देखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी निधीला मंजुरी देत तातडीने पुढील निर्णय घेण्याचा आदेश प्रशासनाला दिला. तसेच स्टाफ पॅटर्नबाबतही योग्य ती कार्यवाही तातडीने करा व प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी द्या, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्याचे पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचीदेखील भेट घेत चर्चा करण्यात आली. यामध्ये पर्यटन विकासदृष्ट्या कणकवली शहर विकसित करण्यासोबत चर्चा करत असताना कणकवली शहरातील २७ व २८ क्रमांकाचे आरक्षण विकसित करण्याकरिता अजून १० कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. यावेळी झालेल्या चर्चेनुसार एकूण २३ कोटी ३० लाखांची दिवाळी बंपर भेट कणकवलीवासीयांना मिळाल्याची माहिती समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी दिली. लवकरच रीतसर प्रक्रिया पूर्ण होऊन या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळेल व ही कामे मार्गी लागतील, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -