दुबई : महिला आशिया कप २०२६ मध्ये श्रीलंकेच्या महिला संघाने शानदार सुरुवात करत संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) ९ गडी राखून पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या गट फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने यूएईने दिलेले ८० धावांचे लक्ष्य अवघ्या ७.५ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात गाठले. (Women’s Asia Cup 2026)
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या यूएईचा डाव श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर फारसा टिकला नाही. संपूर्ण संघ १९.५ षटकांत ७९ धावांवर सर्वबाद झाला. यूएईकडून कर्णधार ईशा ओझाने सर्वाधिक १८ धावा केल्या. तिच्या खेळीत दोन चौकारांचा समावेश होता. (Women’s Asia Cup 2026)
यूएईच्या फलंदाजांची संघर्षमय खेळी :
यूएईने सुरुवातीलाच तीर्था सतीशला शून्यावर गमावले. त्यानंतर लावण्या केनीही केवळ तीन धावांवर बाद झाली. कर्णधार ईशा ओझाने हिना होच्चंदानीसोबत तिसऱ्या विकेटसाठी १९ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हिना होच्चंदानीने १० धावा केल्या. समायरा धरनिधारकाने १७ धावांचे योगदान दिले. रिनिथा रजिथाने १५ धावा करत संघाला काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीलंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर यूएईचा संपूर्ण संघ ७९ धावांवर गारद झाला. (Women’s Asia Cup 2026)
https://www.prahaar.in/2026/08/29/wrestler-khali-meets-with-an-accident-while-traveling-from-punjab-to-sonipat/
श्रीलंकेच्या गोलंदाजांचा भेदक मारा :
श्रीलंकेकडून मिताली अयोध्याने ३.५ षटकांत १४ धावा देत तीन बळी घेतले. तर चेतना विमुक्तीने चार षटकांत १६ धावा देत तीन विकेट्स मिळवल्या. सुगंधिका कुमारीनेही दोन बळी घेत यूएईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. (Women’s Asia Cup 2026)
अटापट्टूची तुफानी फलंदाजी :
८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. इमेशा दुलानी आणि कर्णधार चमारी अटापट्टू यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ३५ चेंडूंमध्ये ५७ धावांची भागीदारी केली. इमेशा दुलानीने १८ चेंडूंमध्ये २५ धावांची खेळी केली. ती धावबाद झाल्यानंतर अटापट्टूने संजना कविंदीसोबत दुसऱ्या विकेटसाठी १२ चेंडूंमध्ये नाबाद २३ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. (Women’s Asia Cup 2026)
https://www.prahaar.in/2026/08/29/womens-asia-cup-2026-indias-opening-match-against-thailand/
२५ चेंडूत ४८ धावा!
कर्णधार चमारी अटापट्टूने अवघ्या २५ चेंडूंमध्ये नाबाद ४८ धावांची धडाकेबाज खेळी केली. तिच्या खेळीत तब्बल सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. संजना कविंदी पाच धावांवर नाबाद राहिली. श्रीलंकेने ७.५ षटकांत ८० धावा करत सामना आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे यूएईच्या एकाही गोलंदाजाला विकेट मिळवता आली नाही. (Women’s Asia Cup 2026)
या शानदार विजयासह श्रीलंकेने महिला आशिया कप २०२६ मध्ये आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली असून, चमारी अटापट्टूची आक्रमक फलंदाजी हा सामन्याचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरला. (Women’s Asia Cup 2026)