पानीपत : प्रसिद्ध कुस्तीपटू आणि WWE स्टार द ग्रेट खलीच्या कारचा शनिवारी पानीपत टोल प्लाझाजवळ अपघात झाला. पंजाबमधून सोनीपतला जाताना हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. द ग्रेट खली सुरक्षित आहे. पण त्याच्या कारचे नुकसान झाले आहे. (The Great Khali)
पंजाबमधून सोनीपतला जाताना पानीपत टोल प्लाझाजवळ द ग्रेट खलीच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर जखम झालेली नाही. द ग्रेट खली सुरक्षित आहे आणि त्याने दुसऱ्या वाहनाने पुढील प्रवास सुरू ठेवला आहे. अपघाताबाबत अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही. (The Great Khali)
ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शनिवारी संध्याकाळी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले. ते राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव ...
द ग्रेट खलीचे मूळ नाव दलीप सिंग राणा आहे. तो हिमाचल प्रदेशचा रहिवासी आहे. त्याने व्यावसायिक कुस्तीच्या जगात भारताला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. WWE मधील त्याच्या शैलीमुळे तो लवकर लोकप्रिय झाला आहे. तो अनेक लोकप्रिय कुस्तीपटूंच्या विरोधात लढला आहे. भारतातही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. (The Great Khali)
कुस्तीमधील सहभागाव्यतिरिक्त, द ग्रेट खलीने भारतातील अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे. त्याने तरुणांना कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. तसेच त्याने देशात व्यावसायिक कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठीही काम केले आहे. (The Great Khali)