Union Budget 2027-28 : केंद्रीय अर्थसंकल्प २०२७-२८ साठी १२ ऑक्टोबरपासून तयारी सुरू करणार, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली माहिती

नवी दिल्ली : देशाचे अर्थ मंत्रालय पश्चिम आशियातील संकट आणि वाढत्या जागतिक अनिश्चितता तसेच अन्न व इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर बारा ऑक्टोबरपासून आर्थिक वर्ष २०२७-२८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू करणार आहे.



अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय परिपत्रकात म्हटले आहे की, खर्च सचिवांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व बैठका बारा ऑक्टोबरपासून सुरू होतील. आर्थिक सल्लागार हे सुनिश्चित करतील की, सहा ऑक्टोबरपर्यंत किंवा त्यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प माहिती प्रणाली (यूबीआयएस) मध्ये आवश्यक माहिती योग्य पद्धतीने नोंदवली जाईल. अर्थसंकल्पीय परिपत्रकानुसार, पुढील आर्थिक वर्ष २०२७-२८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक विकासाला वेग देण्यासाठी सुधारणा पुढे नेण्यासोबतच रोजगारनिर्मिती आणि देशांतर्गत मागणी वाढविण्याच्या उपाययोजनांवर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पपूर्व बैठका नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सुरू राहतील.



परिपत्रकात म्हटले आहे की, निर्धारित नमुन्यातील आकडेवारीच्या प्रतीही पडताळणीसाठी सादर कराव्या लागतील. परिपत्रकात म्हटले आहे की, अर्थसंकल्पपूर्व बैठका पूर्ण झाल्यानंतर २०२७-२८ च्या अर्थसंकल्पीय अंदाज आणि 2026-27 च्या सुधारित अंदाजाला तात्पुरते अंतिम स्वरूप दिले जाईल. परिपत्रकात म्हटले आहे की, अर्थसंकल्पपूर्व बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर मंत्रालये आणि विभागांना प्रारंभिक खर्च मर्यादेची माहिती दिली जाईल. सरकारच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमांचा आणि महसूल अंदाजाचा विचार करून अंतिम खर्च मर्यादा मंत्रालयाकडून निश्चित केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सलग 10वा केंद्रीय अर्थसंकल्प असेल, जो त्या 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेच्या पटलावर सादर करतील.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी १३७ व्या 'मन की बात'मधून कोणत्या विषयांवर काय बोलले ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३० ऑगस्ट २०२६ रोजी १३७ व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता