Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या निमित्ताने नुकताच रांचीला प्रवास केल्यानंतर काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याचा H1N1 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी इम्रानला पुरेशी विश्रांती घेण्यास आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, इम्रान हाश्मी किंवा त्याच्या टीमकडून अद्याप H1N1 संसर्गाबाबत अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. (Imran Hashmi)


दरम्यान, आजारपणामुळे इम्रानला बंगळुरूमधील त्याचा नियोजित कार्यक्रमही पुढे ढकलावा लागला आहे. इम्रानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांना याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रकृती ठीक नसल्यामुळे तो कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही. हा कार्यक्रम आता १२ सप्टेंबर रोजी होणार असून, आधीची तिकिटे नव्या तारखेसाठी वैध राहणार असल्याचे त्याने सांगितले. (Imran Hashmi)



‘अवारपन २’मुळे चर्चेत


इम्रान हाश्मी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अवारपन २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटात त्याने शिवम पंडितची भूमिका साकारली आहे. दिशा पटानीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.


२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवारपन’चा हा सिक्वेल असून, अपहरण झालेल्या मुलांना वाचवण्याच्या इंटरपोलच्या मोहिमेभोवती चित्रपटाची कथा फिरते. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवर त्याने २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचे वृत्त आहे. (Imran Hashmi)


नुकतेच मुंबईतील ‘अवारपन २’च्या स्क्रिनिंगदरम्यान इम्रानने सह-अभिनेत्री दिशा पटानीसोबत चाहत्यांना सरप्राईज दिले होते. मात्र, आता प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला काही काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या

Rakshabandhan : रक्षाबंधनाचं आयकॉनिक गाणं ‘फुलों का तारों का’ खरं तर राखीसाठी बनलंच नव्हतं! जाणून घ्या खास किस्सा

मुंबई : रक्षाबंधन म्हटलं की भावाबहीणीच्या नात्याची आठवण करून देणारं एक गाणं हमखास कानावर पडतं. ‘फुलों का तारों

Bandhu Marathi Film : ‘बंधू’ चित्रपटातून अभिनेता रजत बेदीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; म्हणाला, "कथानकाने माझं लक्ष्य वेधलं"

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) आता 'बंधू' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीचा विस्तार आणखी

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित