नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या ‘कुंभ भक्ती संगम’च्या दुसऱ्या दिवशी नाशिककरांसाठी मैथिली ठाकूर (Maithili Thakur) यांच्या भजनाचा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. शनिवारी (२९ ऑगस्ट) रात्री ८ ते १० या वेळेत ठक्कर डोम येथे मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. याआधी दिवसभर ‘भक्ती संमेलन’च्या माध्यमातून भारतीय संतपरंपरा, समरसता आणि राष्ट्रीय स्तरावरील संतपरंपरेचा सहभाग व समन्वय यावर विचारमंथन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने केले आहे.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी १० ते १२ या वेळेत होणाऱ्या भक्ती संमेलनाच्या पहिल्या सत्राने होईल. ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ या विषयावर या सत्रात विचारमंथन होणार आहे. पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असून, शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होणार आहेत. (Maithili Thakur)
नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून कुंभमेळ्याला विनाकारण बदनाम करण्याचे कारस्थान काहीजण करत आहेत. मात्र, ...
दुपारी २ ते ४ या वेळेत दुसरे सत्र होणार असून, ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ या विषयावर चर्चा होईल. डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असून, राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि भागवताचार्य महंत चिरडे बाबा सहभागी होणार आहेत. भक्ती संमेलनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. (Simhastha Mahakumbhmela)
पहिल्या दिवशी नाशिककरांनी ‘कुंभ भक्ती संगम’ला दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. दुसरा दिवस विचारमंथन आणि भक्तिसंगीताने समृद्ध आहे. विशेषतः मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. नाशिककरांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले. (Simhastha Mahakumbhmela)