Samay Raina Viral video : 'मेरा और सायबर सेल का रिश्ता पुराना है'! देवेंद्र फडणवीस आणि समय रैना एकाच मंचावर, Video Viral

मुंबई : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई कमिश्नर देवेन भारती यांच्यासह अभिनेता आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी, सुनिधी चौहान यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. कॉमेडियन स रैनानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्याने महाराष्ट्र सायबर आणि 1930 हेल्पलाइनचा उल्लेख करत केलेल्या मिश्कील वक्तव्यामुळे कार्यक्रमात हशा पिकला. ( Cyber Awareness)

समय रैनाने महाराष्ट्र सायबरसोबतचे आपले संबंध जुने असल्याचे सांगत 1930 हा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह असल्याचे सांगितले. या हेल्पलाइनवरून आपल्याला अनेकदा फोन येत असल्याचेही त्याने मिश्कीलपणे सांगितले. महाराष्ट्र सायबरच्या कामाचे कौतुक करताना त्याने ते भारतात असो किंवा परदेशात, संशयितांपर्यंत पोहोचू शकतात, अशा आशयाची टिप्पणी केली.



यानंतर समयने आपल्या खास विनोदी शैलीत पूर्वीच्या एका प्रसंगाचा संदर्भ दिला. सायबर सेलचे अधिकारी एका कॉमेडियनच्या घरी पोहोचल्याचा उल्लेख करत त्याने यावेळी मात्र त्याच व्यक्तीचा सन्मान होत असल्याचे सांगितले. समयच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमातील वातावरण हलके झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही.





या कार्यक्रमात सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी कसे सावध राहावे, याबाबतही जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले. पोलीस, सीबीआय किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, कार्यक्रमात ‘Digital Arrest’ या विषयावरील लघुपट आणि ‘1930 Maharashtra Cyber Anthem’चे अनावरण करण्यात आले. कलाकारांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.


Comments
Add Comment

Mumbai Airport T1 Redevelopment : मुंबई विमानतळाचा T१ टर्मिनल होणार बंद; फ्लाइटसाठी नवी मुंबई विमानतळाचा पर्याय

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील T१ टर्मिनलच्या पुनर्विकासाची तयारी सुरू

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून