Monday, August 24, 2026

Nitesh Rane : गणेश मिरवणुकीवर अंडी फेकणारे जिहादी महाराष्ट्रात हवेच कशाला; मंत्री नितेश राणे यांचा संतप्त सवाल

Nitesh Rane : गणेश मिरवणुकीवर अंडी फेकणारे जिहादी महाराष्ट्रात हवेच कशाला; मंत्री नितेश राणे यांचा संतप्त सवाल

भाईचाऱ्याच्या बाता मारणारे आता कुठल्या बिळात लपलेत?

मुंबई : 'माझगावचा मोरया' गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान रविवारी रात्री एका इमारतीतून बाप्पाच्या मूर्तीवर आणि भक्तांवर अंडी फेकल्याचा घृणास्पद प्रकार घडला. या घटनेवर संताप व्यक्त करत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जिहादी प्रवृत्तींवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. गणेश मिरवणुकीवर अंडी फेकणारे जिहादी महाराष्ट्रात हवेच कशाला? देशात भाईचारा आणि गंगा-जमुनी तहजीबचा जप करणारे लोक अशा घटनांच्या वेळी नेमके कुठे लपून बसतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, "आजवर ईद किंवा मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान कुठल्याही हिंदूंनी चपला, अंडी किंवा दगडफेक केल्याची एकही घटना दाखवा. मग गणेशोत्सवाची मिरवणूक निघाल्यावरच अशा विकृत प्रवृत्तींच्या डोक्यात अंडी फेकण्याचे विचार कसे येतात, असा सवाल त्यांनी केला. ९० टक्के हिंदू असलेल्या या देशामध्ये राहून जर कोणी हिंदू सणांवर आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुकींवर अंडी आणि दगडफेक करत असतील, तर अशा जिहाद्यांची ही घाण मुंबईत का ठेवायची? पोलिसांनी या प्रकरणी रात्रीच गुन्हे दाखल केले आहेत आणि संबंधितांना आयडेंटिफायही केले आहे. हिंदूंवर सातत्याने होणारे असे प्रकार हिंदुत्ववादी सरकार असताना खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

"कायद्याचे पालन करण्याचा ठेका फक्त हिंदूंनी घेतलेला नाही. सेक्युलर, फिक्युलरचा टेप रेकॉर्ड चालवणारे आता कुठल्या बिळात लपले आहेत? आज त्यांनी अंडी फेकली आहेत, पण लक्षात ठेवा, उद्या ईदचा दिवसही येईल. आमच्या भगवद्गीतेमध्ये धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या त्या इमारतीमधील जिहाद्यांची नावे आमच्याकडे आली आहेत, आता पुढे त्यांचे काय कार्यक्रम होतात ते बघा, असा इशारा त्यांनी दिला.

"मागून वार करणेच यांच्या धर्मामध्ये लिहिले आहे ना, छातीवर किंवा समोर येऊन लढणार नाही, लपून अंडी मारणार, लपून चप्पल मारणार! यालाच का तुम्ही इस्लाम धर्म म्हणता? दुसऱ्या धर्माच्या सणासुदीवर, उत्सवांवर दगडफेक करणं तुमच्या कुराणमध्ये लिहिलंय का?" असा सवाल राणे यांनी केला.

हिरव्या सापांना ठेचणारच!

  • या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय बारीक लक्ष ठेवून आहेत, असे सांगत नितेश राणे म्हणाले की, "आपल्या राज्याला एक कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री लाभले आहेत. हिंदूंवर कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही. हे सरकार हिंदूंनी निवडून आणलेलं आहे आणि हिंदूंच्या रक्षणासाठीच आमचं सरकार आहे. पाकिस्तानमध्ये बसून ज्यांचे 'अब्बा' या जिहाद्यांना सुरक्षा देत आहेत आणि हवा भरत आहेत, त्या हिरव्या सापांना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत", असा इशारा त्यांनी दिला.
  • "बांगलादेशमध्ये राजरोसपणे हिंदूंना मारण्याचा कार्यक्रम चालू आहे. तिथे असं करण्याची हिंमत कोणी करणार नाही, पण आमच्या हिंदू राष्ट्रात येऊन सणांच्या वेळीच अंडी मारायची का? उद्या आमच्या हिंदू समाजाला तिसरा डोळा उघडावा लागेल, सुरुवात कोणी केली हे लक्षात ठेवा. आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थेवर आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, परंतु आम्हाला जर वारंवार डिवचत राहिलात, तर परिणाम वाईट होतील", असेही राणे म्हणाले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >