Nashik Rain Update : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत विजांचा कडकडाट आणि वादळी वारेही अनुभवास येऊ शकतात. त्यामुळे पावसाची शक्यता असली तरी सर्वच भागांत समान प्रमाणात पाऊस पडेलच असे नाही. शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील हवामानाची स्थिती लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करणे आवश्यक आहे. (Nashik Rain Update)
Nashik Crime : नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असं नाशिक पोलीस गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून वदवून घेत असले तरी नाशिकची गुन्हेगारी 'जैसे थेच' ...
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः जळगाव (Jalgaon) , धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाअभावी पिके ऊन धरू लागली असून फुलोरा अवस्थेतील पिकांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाने आज २४ ऑगस्ट रोजी धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात रविवारी नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Nashik Rain Update)
Nashik Accident News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या २७ वर्षीय युवकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू ...
पावसाअभावी खरीप पिकांवर पाण्याचा ताण
जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत पावसाअभावी खरीप पिकांवर पाण्याचा ताण जाणवू लागला आहे. काही भागांत तर मका, ज्वारी, कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांची वाढ खुंटण्याची तसेच पाने कोमेजण्याची स्थिती निर्माण होत आहे. विशेषतः फुलोरा अवस्थेतील पिकांसाठी या कालावधीत पुरेसा ओलावा मिळणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी उशिरा पेरणीनंतरही चांगली वाढ झालेल्या पिकांकडून उत्पादनाची अपेक्षा ठेवली आहे. मात्र, पावसाचा खंड वाढल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दमदार पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा वाढून पिकांना मोठा आधार मिळू शकतो. (Nashik Rain Update)
Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन मान्सून’ (Mission Green Monsoon) मोहिमेच्या नवव्या ...
दरम्यान, राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून, पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत पावसाच्या सरी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.