कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार, शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह, कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण करणाऱ्या सर्वात तरुण भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने चौथे स्थान पटकावले आहे. गिलने कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी हा पराक्रम केला. त्याने ४३ व्या कसोटीत ३,००० धावांचा टप्पा ओलांडला. या सामन्यापूर्वी, त्याने ४२ कसोटी सामन्यांमध्ये ११ शतके आणि आठ अर्धशतके झळकावली होती.
मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा एका डावाने आणि ५१ धावांनी पराभव ...
सामन्यापूर्वी हा टप्पा गाठण्यासाठी गिलला केवळ सात धावांची गरज होती. डावाच्या २३ व्या षटकात केसरा नुवान्थाच्या गोलंदाजीवर चौकार मारून गिलने आपल्या ३,००० कसोटी धावा पूर्ण केल्या. गिलने वयाच्या २६ वर्षे आणि ३४९ दिवसांत हा पराक्रम करत, या बाबतीत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकले. कपिल देव यांनी वयाच्या २६ वर्षे आणि ३५६ दिवसांत कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या होत्या.
कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच तापले. यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर ...
कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा करणारा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू म्हणून विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने वयाच्या अवघ्या २३ वर्षे आणि २२८ दिवसांत हा पराक्रम केला. या यादीत स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने वयाच्या २६ वर्षे आणि १५७ दिवसांत ३,००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. दिलीप वेंगसरकर यांनी वयाच्या २६ वर्षे आणि २६३ दिवसांत हा टप्पा गाठला होता.
भुवनेश्वर : भारताच्या अॅथलेटिक्सपटूंनी वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्व्हर लेव्हल स्पर्धेत दमदार कामगिरी करत अनेक पदकांवर नाव कोरले. ...
कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा करणारा सर्वात तरुण भारतीय
२३ वर्षे २२८ दिवस – सचिन तेंडुलकर
२६ वर्षे १५७ दिवस – वीरेंद्र सेहवाग
२६ वर्षे २६३ दिवस – दिलीप वेंगसरकर
२६ वर्षे ३४९ दिवस – शुभमन गिल
२६ वर्षे ३५६ दिवस – कपिल देव
दरम्यान, कोलंबो कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार गिलने भारतासाठी 50 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने 6 चौकार मारले. मात्र, चहापानाच्या थोड्या वेळापूर्वी गिल बाद झाला.