Nashik Crime News : भोंदू खंडागळेला चार दिवसांची पोलिस कोठडी; पीडित महिलेच्या पुनर्वसनासाठी नाशिककर सरसावले

नाशिक : गुजरातच्या वलसाड येथील महिलेला फसवून तिच्याकडून ७७ हजार रुपये उकळल्याप्रकरणी नाशिकच्या फुलेनगर येथील भोंदू विशाल खंडागळे आणि पीडितेचा प्रियकर जीतू पवार यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांना २६ ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.


महिलेचे लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवत खंडागळे याने नाशिकच्या अमरधाम येथे अघोरी पूजा केली होती. या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने शुक्रवारी भद्रकाली पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पीडितेचा प्रियकरही सहभागी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. (Nashik Crime News)



दरम्यान, पीडित महिला अत्यंत गरिबीत आणि बेसहारा असल्याने तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. महाराष्ट्र अंनिसच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिरावाडी येथील वासल्य वृद्धाश्रम आणि पंचवटीतील माणुसकी बेघर व पुनर्वसन केंद्राने तिची जबाबदारी स्वीकारली आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून महिलेला प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. (Nashik Crime News)


या भोंदूबाबाने आणखी काही भक्तांची फसवणूक केली असण्याची शक्यता महाराष्ट्र अंनिसने व्यक्त केली आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या व्यक्तींनी महाराष्ट्र अंनिस किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Mahakumbh Mela 2027 : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ची तयारी वेगात; साधुग्राम व्यवस्था अधिक सक्षम

नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने साधुग्राम आणि

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

World Vada Pav Day 2026 : मुंबईच्या रस्त्यांपासून जगभरात पोहोचलेला वडापाव; जाणून घ्या या ‘देसी बर्गर’ची खासियत!

मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे वडापाव! मुंबईच्या गजबजलेल्या

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर