Saturday, October 10, 2026

Amit Satam : 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' काँग्रेसला कधीही स्वीकारणार नाही!

- अमित साटम; देशविरोधी शक्तींकडून पैसे घेऊन अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव

मुंबई : देशातील तरुण वर्ग अर्थात 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' भविष्यातील विकसित भारताच्या दिशेने अत्यंत वेगाने पावले टाकत आहे. त्यामुळे या तरुण पिढीकडून कधीही काँग्रेसला किंवा राहुल गांधींना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळणार नाही, हे त्यांनाही चांगले ठाऊक आहे, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी राहुल गांधींवर केली. (Amit Satam)

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाविषयी साटम म्हणाले, काही देशविरोधी शक्तींकडून मिळालेल्या निधीचा (फंड्सचा) वापर करून, लोकांना २५-२५ हजार रुपये देऊन विद्यार्थ्यांच्या नावाखाली अशा कार्यक्रमांमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात काहे. अशा प्रकारे देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून हिंदुस्थानात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, या देशातील 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' तुम्हाला असा असा दणका देईल, ज्याची 'गुंज' भविष्यातही तुम्हाला ऐकू येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. (Amit Satam)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >