जगातील अव्वल तंत्रज्ञान कंपनी 'ॲपल' (Apple) आपल्या नव्या उपकरणांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कंपनी आपल्या वार्षिक 'सप्टेंबर इव्हेंट'मध्ये नवीन आयफोन १८ (iPhone 18) मालिका सादर करण्याच्या तयारीत आहे. यावेळेस ॲपल आयफोन १८ प्रो, (Iphone 18) आयफोन १८ प्रो मॅक्स (Iphone 18 pro Max) आणि एक नवा 'आयफोन अल्ट्रा' मॉडेल (Iphone Ultra Model) बाजारात आणू शकते. तर साधा आयफोन १८ आणि स्वस्त मॉडेल १८e हे २०२७ च्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने अजून तरी कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, पण लीक झालेल्या माहितीनुसार इव्हेंट कधी होईल याचा अंदाज लावला जात आहे.
सप्टेंबरच्या सुरूवातीलाच का होतो हा सोहळा ?
लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत ...
ॲपलचा एक खास नियम आहे. अमेरिकेमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी 'लेबर डे'ची सुट्टी असते. ही सुट्टी संपल्यानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी किंवा बुधवारीच ॲपल आपला मोठा कार्यक्रम ठेवते. यामुळे कंपनीला नवीन फोन बाजारात विक्रीसाठी ठेवण्यास आणि दिवाळी व नाताळच्या काळात मोठी विक्री गाठण्यास मदत होते. या गणितानुसार, यंदा ८ किंवा ९ सप्टेंबर २०२६ रोजी हा मोठा सोहळा पार पडू शकतो.
गेल्या काही वर्षांतील लाँचिंगचा पॅटर्न
२०२५ (आयफोन १७): ९ सप्टेंबर
२०२० (आयफोन १६): ९ सप्टेंबर
२०२३ (आयफोन १५): १२ सप्टेंबर
२०२२ (आयफोन १४): ८ सप्टेंबर
फक्त २०२० मध्ये कोरोनामुळे याला थोडा उशीर झाला होता. हा इतिहास पाहता ९ सप्टेंबर ही तारीख सर्वात जास्त संभाव्य मानली जात आहे.
अधिकृत घोषणा आणि तारीख कधी कळणार ?
ॲपल सहसा मुख्य कार्यक्रमाच्या १५ दिवस आधी पत्रकारांना आणि लोकांना अधिकृत आमंत्रण पाठवते. दरवर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ही घोषणा केली जाते. जर कंपनीने ९ सप्टेंबरला इव्हेंट ठेवायचा ठरवला, तर येत्या २६ ऑगस्टपर्यंत ॲपलकडून अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली जाऊ शकते.