मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) व्यापार, पर्यटन आणि बंदराधारित विकासाला नवी दिशा देत क्रूझ पर्यटन, मरिना विकास, जहाजबांधणी, वॉटरफ्रंट पायाभूत सुविधा आणि सागरी सेवांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी जागतिक भागीदारी संवादाचा शुभारंभ केला आहे. मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल येथे आयोजित विशेष संवाद सत्रात विविध देशांचे कॉन्सुल जनरल, राजनैतिक मिशनचे प्रतिनिधी, सागरी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. (Mumbai Port Global Partnership)
मुंबई बंदर प्राधिकरणाच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश परदेशी राजनैतिक मिशन आणि व्यापार प्रतिनिधींना मुंबई बंदर तसेच महाराष्ट्रातील सागरी क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या गुंतवणूक आणि विकासाच्या संधींशी जोडणे हा होता. १५० वर्षांहून अधिक काळ भारताचे प्रमुख सागरी प्रवेशद्वार म्हणून कार्यरत असलेल्या मुंबई बंदराच्या विकासाच्या पुढील टप्प्यात जागतिक भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. (Mumbai Port Global Partnership)
मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू यांनी यावेळी आधुनिक बंदरांची बदलती भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आजची बंदरे केवळ मालवाहतुकीपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. लॉजिस्टिक्स, प्रवासी वाहतूक, सागरी पर्यटन, जहाजबांधणी, बंदराधारित विकास आणि जागतिक व्यापार सहकार्य यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा विस्तार होत आहे. (Mumbai Port Global Partnership)
मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी प्राप्त होत असल्याच्या ...
“मुंबई बंदराने भारताला १०० हून अधिक देशांशी जोडले आहे. आता हे संबंध मालवाहतुकीच्या पलीकडे नेऊन क्रूझ पर्यटन, मरिना विकास, जहाजबांधणी, अधिवेशन सुविधा आणि व्यापक सागरी अर्थव्यवस्थेपर्यंत विस्तारण्याचे आमचे ध्येय आहे,” असे डॉ. अंगमुथू यांनी सांगितले. त्यांनी ‘मेरिटाइम इंडिया व्हिजन २०३०’ आणि ‘मेरिटाइम अमृत काळ व्हिजन २०४७’ या राष्ट्रीय उद्दिष्टांशी या उपक्रमाची सांगड घातली. (Mumbai Port Global Partnership)
या संवाद सत्रात चार महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलला भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख क्रूझ आणि प्रवासी सुविधा म्हणून सादर करण्यात आले. तसेच १४ हेक्टर जलक्षेत्रात विकसित होणाऱ्या आणि ४२४ यॉट्सची क्षमता असलेल्या ‘विकसित भारत मुंबई मरिना’ प्रकल्पातील संधींवर प्रकाश टाकण्यात आला. यॉटिंग, नौकानयन, सागरी सेवा, यॉट दुरुस्ती आणि वॉटरफ्रंट पर्यटन क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीच्या शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (Mumbai Port Global Partnership)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ...
याशिवाय मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र आणि व्यावसायिक विकास प्रकल्प तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रीय मेगा जहाजबांधणी क्लस्टर यांची माहिती देण्यात आली. जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि संबंधित सागरी उद्योगांना चालना देण्यासाठी हा क्लस्टर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले. (Mumbai Port Global Partnership)
कार्यक्रमाची सुरुवात मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपसंरक्षक कॅप्टन प्रवीण कुमार सिंह यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर मुंबई बंदराच्या विकास प्रवासावर आधारित कॉर्पोरेट चित्रफीत दाखवण्यात आली. उपाध्यक्ष आदेश तितारमारे आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांनी विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले. आभार प्रदर्शन मुंबई पोर्ट अथॉरिटीचे वाहतूक व्यवस्थापक विपिन आर. मेनोथ यांनी केले. (Mumbai Port Global Partnership)




