मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा (Govinda - Sunita Ahuja) यांच्या वैवाहिक नात्यातील मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुनीता अहुजा यांना मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाबाहेर पाहिल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी घटस्फोटाची प्रक्रिया मागे घेतल्याचे वृत्त समोर आले. या पार्श्वभूमीवर ‘बिग बॉस’ फेम अभिनेता एजाज खानने (Eijaz Khan) सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या वादावर भाष्य केले आहे. (Eijaz Khan on Govinda controversy)
एजाज खानने आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये सुनीता अहुजा यांना ‘सुनीता भाभी’ असे संबोधत गोविंदाची बाजू घेतली. या प्रकरणात बोलण्याचा आपल्याला अधिकार नसला तरी आता कौटुंबिक वाद सार्वजनिक झाल्यामुळे एक धाकटा भाऊ म्हणून आपण सल्ला देत असल्याचे त्याने म्हटले. (Eijaz Khan on Govinda controversy)
मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून विविध चर्चा सुरू आहेत. दोघांच्या ...
‘मुलांवरही परिणाम होऊ शकतो’ :
एजाजने सुनीता अहुजा यांना कौटुंबिक वाद सार्वजनिक न करण्याचा सल्ला दिला. पालकांमधील सार्वजनिक वादाचा परिणाम त्यांच्या मुलांवरही होऊ शकतो, अशी चिंता त्याने व्यक्त केली.
विशेषतः गोविंदा आणि सुनीता यांची मुलं भविष्यात मनोरंजन क्षेत्रात काम करू इच्छित असतील, तर पालकांमधील वादाचा त्यांच्या व्यावसायिक प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे एजाजने म्हटले. वादग्रस्त कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे काही कॉर्पोरेट्स किंवा प्रॉडक्शन हाऊसेस काम देताना सावध भूमिका घेऊ शकतात, असा दावा त्याने केला. (Eijaz Khan on Govinda controversy)
‘गोविंदा स्वतःच्या मेहनतीने मोठा झाला’ :
एजाज खानने गोविंदाच्या कारकिर्दीचे कौतुक करताना तो स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मोठा कलाकार बनल्याचे म्हटले. तसेच कौटुंबिक मतभेद घराच्या चौकटीतच सोडवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्याने दिला. गोविंदाने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक प्रसंगी संयमाने आणि आदराने प्रतिक्रिया दिल्याचे सांगत एजाजने त्याचे कौतुक केले. त्याचबरोबर सुनीता यांनी इतर व्यक्तींच्या प्रभावाखाली येऊ नये, असेही त्याने म्हटले. (Eijaz Khan on Govinda controversy)
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे तुफान चर्चेत आला होता. या वादग्रस्त ...
सुनीता अहुजा न्यायालयाबाहेर दिसल्या :
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू असताना सुनीता यांना त्यांचा मुलगा यशवर्धन याच्यासोबत मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाबाहेर पाहण्यात आले होते. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा वेग आला. मात्र, गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सुनीता अहुजा यांनी घटस्फोटाची प्रक्रिया मागे घेतल्याचे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या दाम्पत्याच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना सध्या वेगळे वळण मिळाले आहे. (Eijaz Khan on Govinda controversy)
View this post on Instagram




