Nashik Crime : नाशिकरोड परिसरात वर्चस्ववादाच्या लढाईत सराईत गुन्हेगारांकडून ३२ वर्षीय सुमित पगारे या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. उपचारादरम्यान यात सुमितचा मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास गोसावीवाडीतील टिळे हॉस्पिटलसमोरील गंगोत्री जनता स्टोअर येथे सुमित पगारे उभा होता. यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात पगारेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, दरम्यान आता या प्रकरणात नाशिकरोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. (Nashik Crime News)
Nashik News : आपलं घर असावं, हसतं खेळतं कुटुंब असावं आणि आपल्या मुलांचा भविष्य उज्ज्वल असावं असं प्रत्येकालाच वाटतं यासाठी आई वडील मोठे कष्ट करतात बऱ्याचदा ...
नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) १४ आरोपींपैकी १२ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांना न्यायालयाने (Court) तीन दिवसांची म्हणजे 21 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दोन संशयित आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना (Citizen) शांतता राखण्याचे आवाहन केले असून,पुढील तपास नाशिकरोड पोलिस करत आहेत. (Nashik Crime News)
Beed : बीड जिल्हा रुग्णालयात घडलेला एक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
नेमकं प्रकरण काय ?
फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास गोसावीवाडीतील टिळे हॉस्पिटलसमोरील गंगोत्री जनता स्टोअर येथे सुमित पगारे (३२, रा. पगारे चाळ) सायंकाळी उभा होता. त्यावेळी आरोपींनी तेथे येऊन जुना वाद उकरून काढला. मागील वादाच्या कारणावरून संशयितांनी तिघांच्या अंगावर धाव घेत शिवीगाळ केली. संशयित राजिक शेख याने सुमित पगारे यांना ‘आपल्यातील वाद मिटवून टाकू,’असे सांगत हातात हात मिळविण्याचा बहाणा केला. त्याचवेळी त्याने कमरेला लावलेले पिस्तूल काढून सुमित पगारे यांच्या पोटावर दोन गोळ्या झाडल्या, असे फिर्यादीत नमूद आहे. (Nashik Crime News)
Nashik Accident News : नाशिकमध्ये रस्ते अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) दहाव्या मैलाजवळ हॉटेल अमृत पंजाब आणि गरवारे पॉईंट ...
गोळ्या थेट पोटात शिरल्याने सुमित गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या सुमीतला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे नाशिकरोडमध्ये वाढलेली गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.






