President's Gallantry Medal : मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या १३ अग्निशमन जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शौर्याचा राष्ट्रीय गौरव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहुल-चेंबूर येथील मैसूर कॉलनी मोनोरेल स्थानकाजवळ सुमारे ४० ते ५० फूट उंचीवर अचानक थांबलेल्या मोनोरेलमधील १८२ प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलातील १३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या पदकांची घोषणा करण्यात आली आहे. ही घटना ११ जून २०२४ रोजी सायंकाळी सुमारे ६.३८ वाजता घडली होती. मोनोरेल उंचावर अचानक बंद पडल्याने त्यामधील १८२ प्रवासी अडकले होते. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. उंचावर अडकलेल्या मोनोरेलमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान होते. सुमारे ४० ते ५० फुट उंचीवर अत्यंत सावधगिरीने जवानांनी बचावकार्य राबविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अत्यंत कठीण परिस्थितीत काम केले. त्यांची तत्परता, धाडस, तांत्रिक कौशल्य आणि प्रसंगावधान यामुळे सर्व १८२ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.


या बचाव मोहिमेदरम्यान दाखविलेल्या असाधारण शौर्य, धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यकुशलतेची दखल घेत १३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती शौर्य पदकासाठी निवड करण्यात आली आहे. या अग्निशमन जवानांच्या धाडसी कामगिरीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आणि १८२ प्रवाशांचे प्राण वाचले. राष्ट्रपती शौर्य पदकासाठी झालेली त्यांची निवड ही मुंबई अग्निशमन दलाच्या शौर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील गौरव मानला जाते.



या १३ अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान


आर. एन. अंबुलगेकर — (प्रमुख अग्निशमन अधिकारी), विक्रोळी अग्निशमन केंद्र


ए. व्ही. परब — (उपप्रमुख अग्निशमन अधिकारी) दादर अग्निशमन केंद्र


एम. के. सावंत — (विभागीय अग्निशमन अधिकारी), दादर अग्निशमन केंद्र


आर. के. कांबळे — (वरिष्ठ केंद्र अधिकारी) फोर्ट अग्निशमन केंद्र


वाय. एच. पवार — (केंद्र अधिकारी, चेंबूर) अग्निशमन केंद्र


डी. ए. भोसले — (केंद्र अधिकारी) वडाळा अग्निशमन केंद्र


राजेश विष्णू राणे — (यंत्रचालक)चेंबूर अग्निशमन केंद्र


महेश आनंद गुडलककर — (यंत्रचालक) फोर्ट अग्निशमन केंद्र


रमेश जीवन कोटी — (अग्निशामक) वडाळा अग्निशमन केंद्र


हर्षल शंकर कटके — (अग्निशामक) वडाळा अग्निशमन केंद्र


चिंतामणी शिवाजी खांडकर — (अग्निशामक), फोर्ट अग्निशमन केंद्र


विकी नागेश सरवदे — (अग्निशामक) फोर्ट अग्निशमन केंद्र


सुदर्शन घनश्याम पावडे — (अग्निशामक), चेंबूर अग्निशमन केंद्र

Comments
Add Comment

Worli Century Land : वरळीतील सेंच्युरीची जागा पेडर रियल्टी कंपनीकडे भाडेतत्वावर; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

- महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार १,३५१ कोटी रुपये - स्थानिकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी होणार, अध्यक्षांनी दिली

BMC NEWS : पदपथ अतिक्रमण मुक्त मोहिमेला अडथळा; जेसीबी अभावी विभागातील कारवाई थंडावली

स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर

BMC : क्यु आर कोड ओळखपत्र दिल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई; फेरीवाल्यांवर कारवाईचे स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र पडसाद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने सन २०१४च्या सर्वेमध्ये नोंदणीकृत झालेल्या फेरीवाल्यांना

BMC News : सर्वेतील सुमारे ४ हजार फेरीवाले ठरले मयत

- तब्बल ३७ हजार ७८८ फेरीवाले संपर्क क्षेत्राच्या बाहेर मुंबई (विशेष प्रतिनिधी) पथविक्रेता सर्वेक्षणातून

Central Railway : मुंबईची लाईफलाईन देणार गुड न्यूज! मध्य रेल्वेवर स्वातंत्र्यदिनापासून 15 डब्यांच्या आणखी 22 लोकल धावणार

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी आणखी 22 उपनगरीय लोकल गाड्यांचे 12 डब्यांवरून 15

Government Officers : बदलीनंतरही शासकीय घर न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा भत्ता रोखणार

- राज्य सरकारचा निर्णय; नवीन नियमावली तात्काळ प्रभावाने लागू मुंबई : बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून बदली