JP Nadda : जेपी नड्डांची दिल्लीच्या एम्समध्ये अँजिओग्राफी

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गुरुवार १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळीच एम्समध्ये दाखल झाले आहेत. नड्डा यांची कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांना एम्सच्या हृदयरोग विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.



"केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी कोरोनरी अँजिओग्राफीसह विविध चाचण्यांद्वारे तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना एम्सच्या हृदयरोग विभागात निरीक्षणाखाली दाखल करण्यात आले आहे," असे रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अधिकृत निवेदनात नमूद केले आहे.



मूळचे हिमाचल प्रदेशचे रहिवासी असलेल्या जे. पी. नड्डा यांचा जन्म २ डिसेंबर १९६० रोजी बिहारमधील पाटणा येथे झाला. त्यांनी पाटणा विद्यापीठातून बी.ए. केले. नंतर हिमाचल प्रदेश विद्यापीठातून एलएल.बी.चे शिक्षण घेतले. तरुणप तरुणपणी नड्डा यांनी जयप्रकाश नारायण यांच्या विविध चळवळींमध्ये सक्रियपणे भाग घेतला होता. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (ABVP) संबंधित होते आणि १९८९ मध्ये संघटनेचे राष्ट्रीय सचिव झाले होते. पुढे १९९१ मध्ये नड्डा यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष करण्यात आले. ते १९९३ मध्ये पहिल्यांदाच हिमाचल प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि विरोधी पक्षनेते झाले. नंतर १९९८ मध्ये पुन्हा निवडून आले आणि भाजपच्या राज्य सरकारमध्ये आरोग्य मंत्री झाले. नड्डा यांना २०१० मध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले. ते २०१२ मध्ये राज्यसभेत खासदार झाले. यानंतर २०१४ ते २०१९ या कालावधीत नड्डा देशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते. जून २०१९ मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि जानेवारी २०२० मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले'

केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचा नागरी

DCM Eknath Shinde : '‘नीडर लीडर’ रामदास आठवले हे सामाजिक न्यायाचे बुलंद नेतृत्व'

सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न मुंबई :

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

Ajit Doval : "जमीन, आकाश किंवा पाताळात... आम्ही त्यांचा माग काढू" , 'ऑपरेशन सिंदूर'बाबत पंतप्रधान मोदींचा संदेश ; अजित डोवाल यांच्याकडून आठवणींना उजाळा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट संदेश होता की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारे मग ते

Draupadi Murmu : स्वतंत्र भारताला 'विकसित भारत' बनवण्यासाठी कटिबद्ध व्हा! ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील आणि परदेशात

Fast Track Court : महाराष्ट्रात ११७ फास्ट ट्रॅक कोर्ट, १.३५ लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित

नवी दिल्ली : देशात सध्या कार्यरत असलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टांची (जलद गती न्यायालये) एकूण संख्या ८८४ असून, १७,५४,६७५