Worli Asphalt Plant Site : वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा दिली भाडेतत्वावर

- महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्सची करावी लागली खरेदी


- यंदा तब्बल अडीच कोटींचे खरेदी केले कोल्डमिक्स


मुंबई (सचिन धानजी)


मुंबईतील डांबरी रस्ते आणि खड्डे बुजवण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या कोल्डमिक्सचे उत्पादन जिथून केला जात होता, त्या वरळी अस्फाल्ट प्लांटची जागा भाडेकरारावर देण्यात येत आहे. या जागेचा भाडेकरार करण्यात येत असल्याने यंदा खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स करता या जागेचा वापर करता येत नाही. महापालिकेला याचे उत्पादन करता येत नसल्याने अखेर हे कोल्डमिक्स खासगी कंत्राट कंपनीकडून खरेदी करण्याची वेळ आली आहे. तब्बल १ हजार मेट्रीक टन कोल्डमिक्स खरेदी करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी तब्बल सव्वा दोन कोटी रुपये मोजले जात आहे. (Worli Asphalt Plant Site)



मुंबईत मागील तीन वर्षांपासून सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यात येत असल्याने आता दरवर्षी होणारा खड्डयांवरील खर्च कमी झाल्याचा दावा केला जात आहे. एरव्ही १०० ते २०० कोटी रुपये खर्च होणाऱ्या खड्डयांच्या कामांवर यंदा केवळ ४२ कोटी २३ लाख रुपये खर्च केला जात आहे. मागील वर्षी केवळ खड्डे बुजवण्याच्या कामांवर ७९ कोटी रुपये खर्च झाले होते, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात खड्डे बुजवण्याच्या कामांमध्ये ४५ टक्के घट झाल्याचा दावा प्रशासनाच्यावतीने आणि पर्यायाने सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणारे खड्डे त्वरीत बुजवण्यासाठी कोल्डमिक्स तंत्राचा वापर केला जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २६ विभागीय कार्यालयात पावसाळ्याच्या कालावधीत खड्‌डे बुजविण्यासाठी कोल्ड मिक्स मिश्रणाचा सहा महिन्या करीता पुरवठा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये सहा महिन्याच्या कालावधीसाठी या कोल्डमिक्सचा पुरवठा करण्यासाठी मित्तल पेट्रोफार्माकेम या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी २ कोटी ३६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. (Worli Asphalt Plant Site)


महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळयात वारंवार खडडे पडण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी महानगरपालिकेने वरळी स्थित बॅच मिक्स सयंत्रामध्ये कोल्ड मिक्स मिश्रण तयार करुन त्याचा २६ विभागीय कार्यालयांना खड्डे बुजविण्यासाठी मार्च २०२६ पर्यंत पुरवठा केला जात होता. परंतु या अस्फाल्ट प्लांटची जागा भाडेतत्वावर देण्याची कार्यवाही चालू असल्याने एप्रिल २०२६ पासुन कोल्ड मिक्सचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. त्याप्रमाणे २६ विभागीय कार्यालयात पावसाळा कालावधीत खड्‌डे बुजविण्यासाठी कोल्ड मिक्स मिश्रणाचा सहा महिन्या करीता पुरवठा करण्याबाबत नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. (Worli Asphalt Plant Site)



सध्या ही बाब तातडीची असल्याने विभागाच्या प्रमुख अभियंता यांच्या अधिकारात ५० लाखांच्या मर्यादेत पुरवठा करण्यासाठी संबंधित कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे. (Worli Asphalt Plant Site)

Comments
Add Comment

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, बहिणीच्या घरी रक्षाबंधनानिमित्त आगमन; विमानतळावर एकनाथ शिंदेंसोबत १० मिनिटे चर्चा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी

BMC : मुंबईतील १९७ किलोमीटर अंतराचे पदपथ झाले अतिक्रमणमुक्त; महापलिका प्रशासनाचा दावा

तब्बल २०० पैकी १३४ रस्त्यांच्या पदपथावरील अतिक्रमण हटवले https://prahaar.in/2026/08/29/bjp-minister-jaykumar-gores-brother-joins-shiv-sena/ मुंबई (विशेष

Agniveer : अग्निवीरांसाठी खूशखबर! सेवेतून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्रात मिळणार पुनर्नियुक्ती

राज्य सरकारकडून १ हजार अधिसंख्य पदे मंजूर; गृह, वन, राज्य उत्पादन शुल्क आणि नगर विकास विभागांचा

Mumbai Higjh Court : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या ‘मराठी सक्ती’विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

राज्य सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार मुंबई : राज्यातील रिक्षा आणि

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालय FDA वर नाराज, MCA च्या बंद आस्थापना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपली ताठर भूमिका सोडावी, अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी लागेल,

Chinchpokli-cha Chintamani : यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय; ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा