Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी लाल किल्ल्यावर कडक बंदोबस्त, १५ ते २० हजार जवान तैनात; हजाराहून अधिक सीसीटीव्हींची नजर

नवी दिल्ली : १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी रविवारी लाल किल्ल्यावर केलेल्या मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील आधारित सुरक्षा व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली.


दिल्ली पोलीस उत्तर जिल्ह्याचे पोलीस उपआयुक्त राजा बांठिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मनुष्यबळ तैनात करणे आणि तांत्रिक प्रणालीचा वापर करणे, असे सुरक्षेचे नियोजन दोन भागात विभागले गेले आहे. दिल्ली पोलीस वाहतूक विभाग, उत्तर जिल्हा पथके, स्थानिक पोलीस, पीसीआर, विशेष शाखा ), स्पेशल सेल आणि सामान्य सुरक्षा कर्मचाऱ्यांसह विविध यंत्रणांचे १५ ते २० हजार सुरक्षा जवान तैनात केले जातील. तसेच निमलष्करी दलाच्या अनेक कंपन्या, कमांडो, राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या 'हिट टीम्स' आणि स्नायपर्स लाल किल्ल्यावर तैनात असतील. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक उपस्थित असेल. याशिवाय, वॉचटॉवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी त्वरित प्रतिसाद देणारी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.



लाल किल्ला आणि लगतच्या परिसरात हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांच्या फुटेजवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी चेहरा ओळखणारी प्रणाली, गाड्यांच्या नंबर प्लेट ओळखणारे तंत्रज्ञान आणि घुसखोरी शोधणाऱ्या व्हिडिओ ॲनालिटिक्सचा वापर केला जात आहे. हवेतील संभाव्य धोके रोखण्यासाठी अँटी-ड्रोन सिस्टीम बसवण्यात आल्या आहेत. तसेच, काही पोलिसांना बॉडी-वर्न कॅमेरे देण्यात आले आहेत आणि सोशल मीडियावरील हालचालींवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे.


दरम्यान, 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवारी संध्याकाळी दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथील परम योद्धा स्थळावर भारतीय हवाई दलाच्या बँडचे विशेष सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या देशभक्तीपर संगीतमय कार्यक्रमात ३२ हवाई सैनिक आणि तीन महिलांसह ८ अग्निविरवायू असे एकूण ४० संगीतकार सहभागी झाले आहेत. मास्टर वॉरंट ऑफिसर ए. श्रीहरी हे या कार्यक्रमाचे प्रमुख चालक आहेत.

Comments
Add Comment

Swine Flu : महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र,

India China Border : भारत-चीन सीमा विवादावर टप्प्याटप्प्याने तोडग्याची तयारी

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील सहा दशकांहून जुना सीमा विवाद टप्प्याटप्प्याने सोडवण्याच्या दिशेने हालचाली

FSSAI New Rules : पॅकबंद पदार्थांच्या पाकिटांवर आता दिसणार 'धोक्याचा सिम्बॉल'

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर ताश्याऱ्यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पॅकबंद

Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पूजा आयोजकांसाठी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तानच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताकच्या चार दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले

POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोष उसळला; लष्करी नियंत्रणाविरोधात ‘संयुक्त आवामी कृती समिती’चे मोठ्या आंदोलनाचे आवाहन

पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) पाकिस्तानी लष्कराच्या दडपशाहीविरोधात तेथील नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला आहे.