Sonu Nigam : 'ना जाने तुम....' सोनू निगमने ऑपरेशन थिएटरमध्येही जपली संगीताची साथ; शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांसाठी गायले गाणे

मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेदरम्यानही त्याने संगीताची साथ सोडली नाही. ऑपरेशन सुरू असताना सोनूने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी गाणे गायले. या खास क्षणाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला असून, तो सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.


सोनू निगमने 9 ऑगस्ट रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ऑपरेशन थिएटरमधील एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या ‘सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे’ या गाण्याच्या ओळी गाताना दिसत आहे. शस्त्रक्रियेदरम्यान वेदना होत असतानाही सोनूने डॉक्टर आणि त्यांच्या टीमसाठी हे गाणे सादर केले.



व्हिडिओसोबत सोनूने आपल्या डॉक्टरांचे आणि वैद्यकीय टीमचे आभार मानले. शस्त्रक्रियेदरम्यान अचानक केलेले हे सादरीकरण असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून, तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


काही दिवसांपूर्वी सोनूने आपल्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. त्यावेळी त्याने खांद्यावर पॅच लावलेला फोटो आणि व्हिडिओ शेअर केला होता. नसांशी संबंधित त्रासामुळे त्याला मोठ्या वेदना होत असल्याचे त्याने सांगितले होते. अगदी साध्या हालचाली करतानाही त्रास होत असल्याचे त्याने म्हटले होते.


प्रकृतीची स्थिती जाणून घेण्यासाठी सोनूवर एमआरआय आणि सीटी स्कॅनसह काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, शस्त्रक्रियेचे नेमके कारण आणि वैद्यकीय स्थितीबाबत सोनूने सविस्तर माहिती दिलेली नाही.


दरम्यान, ऑपरेशन थिएटरमधून शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे सोनूच्या संगीतावरील प्रेमाची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली. चाहत्यांकडून त्याच्या लवकर बरे होण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या

Rakshabandhan : रक्षाबंधनाचं आयकॉनिक गाणं ‘फुलों का तारों का’ खरं तर राखीसाठी बनलंच नव्हतं! जाणून घ्या खास किस्सा

मुंबई : रक्षाबंधन म्हटलं की भावाबहीणीच्या नात्याची आठवण करून देणारं एक गाणं हमखास कानावर पडतं. ‘फुलों का तारों

Bandhu Marathi Film : ‘बंधू’ चित्रपटातून अभिनेता रजत बेदीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; म्हणाला, "कथानकाने माझं लक्ष्य वेधलं"

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) आता 'बंधू' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीचा विस्तार आणखी