Sunday, August 9, 2026

Iran News : चर्चेला उधाण आले असताना Viral झाला खामेनींचा Video, व्हिडीओत दिसला अर्धा चेहरा

Iran News : चर्चेला उधाण आले असताना Viral झाला खामेनींचा Video, व्हिडीओत दिसला अर्धा चेहरा

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मृत्यू झाला आहे किंवा ते गंभीर जखमी आहेत आणि वाचण्याची शक्यता कमी आहे अशा स्वरुपाच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसत असलेली व्यक्ती मोजतबा खामेनी असल्याचे इराणच्या सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत जी व्यक्ती दिसत आहे त्या व्यक्तीच्या चेहऱ्याची फक्त एकच बाजू व्यवस्थित दिसत. याच कारणामुळे व्हिडीओच्या सत्यतेवरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.

इराणच्या मेहर या सरकारी वृत्तसंस्थेने मोजतबा खामेनी यांच्याशी संबंधित जो व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे त्यावरूनच उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. व्हायरल व्हिडीओतील मोजतबा खामेनी सुदृढ दिसत आहेत. पण पूर्ण व्हिडीओत त्यांच्या चेहऱ्याची फक्त एकच बाजू दिसत आहे. व्हिडीओत ते शिया धर्मगुरूंसोबत चर्चा करत असताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबतचा आहे याचा उल्लेख नाही.

व्हिडीओत मोजतबा खामेनी आणि निवडक शिया धर्मगुरू चर्चा करत आहेत. मोजतबा यांच्या समोर चहाचा कप ठेवलेला दिसतो. पण व्हिडीओ नेमक्या कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबतचा आहे याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मृत्यू झाला आहे किंवा ते गंभीर जखमी आहेत आणि वाचण्याची शक्यता कमी आहे अशा स्वरुपाच्या बातम्या दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मोजतबा खामेनींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

इराणच्या अंतर्गत सूत्रांच्या दाव्यानुसार राष्ट्राध्यक्ष मोजतबा खामेनी जीवंत आहेत आणि निवडक व्यक्तींच्या संपर्कात राहून नेतृत्व करत आहेत. पण व्हायरल व्हिडीओत चेहऱ्याची एकच बाजू दिसत असल्यामुळे हा व्हिडीओ खरा आहे की यात AI तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे अमेरिका आणि इस्रायलने इराणवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिल्यांदा हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये अयातुल्ला अमी खामेनी आणि त्यांचे निवडक नातलग ठार झाले. पण मोजतबा खामेनी वाचले होते. नंतर या मोजतबा खामेनींनीच देशाचे नेतृत्व स्वीकारल्याची बातमी आली. पण पद स्वीकारल्यापासून मोजतबा खामेनी एकदाही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. लेखी स्वरुपातच त्यांच्या सर्व सूचना सहकाऱ्यांना प्राप्त होत आहेत. यामुळेच मोजतबा खामेनी जीवंत आहेत की त्यांच्या जीवंत असण्याचा खोटा प्रचार करून इराण शत्रूला फसवण्याचा प्रयत्न करत आहे यावरून चर्चा सुरू आहे.

याआधी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन यांनी एका रात्री बिलकूल प्रकाश नसलेल्या अशा अंधाऱ्या कारमध्ये मोजतबा खामेनी यांच्यासोबत भेट झाल्याचे सांगितले. या भेटीत सुरक्षेच्या कारणांमुळे हस्तांदोल झाले नव्हते. खामेनी यांचा चेहरा त्यावेळी दिसलाच नव्हता त्यामुळे आपण भेटलो ती व्यक्ती खरंच मोजतबा खामेनी आहे की नाही हा प्रश्न पेजेश्कियन यांना सतावत होता. पण इराणची सुरक्षा यंत्रणा आजही खामेनी देशाचे नेतृत्व करत असल्याचे सांगत आहे. त्यामुळे खामेनी जीवंत आहेत की नाही हा प्रश्न नव्याने चर्चेत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >