पंजाब : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (BSF) उधळून लावला. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील दाओके गावाजवळ ही घटना घडली. भारताच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला बीएसएफच्या जवानांनी गोळीबार करून ठार केले.
पहाटे कुंपणाजवळ संशयास्पद हालचाल :
मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफचे जवान पहाटे दाओके गावाजवळील काटेरी कुंपणाच्या परिसरात नियमित गस्त घालत होते. त्यावेळी कुंपणाजवळील झुडपांमध्ये काहीतरी संशयास्पद हालचाल जवानांच्या निदर्शनास आली. जवानांनी झुडपांमध्ये असलेल्या व्यक्तीला बाहेर येण्यास सांगितले. काही वेळाने तो व्यक्ती बाहेर आला आणि काटेरी कुंपणाच्या दिशेने पुढे जाऊ लागला. (India - Pak Border)
Mumbai : मुंबईच्या बहुप्रतिक्षित आणि रखडलेल्या सायन रेल्वे ओव्हर ब्रिजच्या (आरओबी) पुनर्बांधणीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनेक वेळा मुदत ...
थांबण्याचा इशारा, तरीही पुढे जात राहिला :
सुरक्षा जवानांनी संशयिताला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्याने जवानांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत भारतीय हद्दीच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात संशयिताचा जागीच मृत्यू झाला.(India - Pak Border)
मृताकडे ओळखपत्र सापडले नाही :
घटनेनंतर बीएसएफने तातडीने घरिंदा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची तपासणी सुरू केली. मृत व्यक्तीकडे कोणतेही ओळखपत्र किंवा अन्य कागदपत्रे आढळली नसल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळावरून कोणतीही प्रतिबंधित वस्तू किंवा संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले नसल्याची माहिती आहे. (India - Pak Border)
मुंबई : बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदाच्या ‘जोरू का गुलाम’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते शकील नूरानी (७३) यांना ...
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल :
बीएसएफ जवानांच्या तक्रारीच्या आधारे घरिंदा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला असून, या व्यक्तीची ओळख आणि तो सीमा परिसरात नेमका कोणत्या उद्देशाने आला होता, याचा तपास केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सीमा परिसरात गस्त आणि निगराणी वाढवण्यात आली असून, सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. (India - Pak Border)






