नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष J.D. वन्स (Vice President J.D. Ones) यांनी शनिवारी (8 ऑगस्ट 2026) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. (India-America Relation)
या चर्चेत व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, महत्त्वपूर्ण खनिजे तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वन्स यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीतील विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. (India-America Relation)
वन्स यांच्या कुटुंबाला मोदींच्या शुभेच्छा :
या फोन संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वन्स (Vice President J.D. Ones) आणि त्यांच्या पत्नी, सेकंड लेडी उषा वन्स यांना मुलगा झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी वन्स यांच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा व्यक्त केल्या. भारतीय बाजूने जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला. उच्चस्तरीय संवादातील सातत्यपूर्ण गतीचे त्यांनी स्वागत केले. (India-America Relation)
मालवण : एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेकांना वाटतं की एआय हे बड्या उद्योगांमध्ये, मोठ्या कारखान्यांमध्ये, महाकाय ...
व्यापार करारावर चर्चा झाली का?
या चर्चेत प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार (India-America Relation) कराराचा मुद्दा उपस्थित झाला की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अमेरिकेच्या बाजूनेही फोनवरील चर्चेचा सविस्तर तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. जूनमध्ये फ्रान्समध्ये झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर संतुलित, परस्पर फायदेशीर आणि व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार कराराच्या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले होते. (India-America Relation)
तणावानंतर संबंध सुधारण्याचे प्रयत्न :
गेल्या वर्षभरात भारत-अमेरिका संबंधांमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेने भारतावर दंडात्मक स्वरूपाचे शुल्क लावल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांवर परिणाम झाला. तसेच मे 2025 मधील भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षाच्या शमवण्यात आपली भूमिका असल्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेला दावा भारताकडून स्पष्टपणे फेटाळण्यात आला होता. (India-America Relation)
Received a phone call from US Vice President JD Vance. We discussed ways to further deepen India-US Comprehensive Global Strategic Partnership across key areas. Warmly congratulated him and the Second Lady on the birth of their son and conveyed best wishes to the entire family.…
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2026
भारताने सातत्याने स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेमुळे शत्रुत्व थांबले आणि त्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती. याशिवाय अमेरिकेच्या नव्या इमिग्रेशन धोरणामुळे आणि H-1B व्हिसा शुल्कवाढीच्या निर्णयामुळेही भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम झाला. मात्र, गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांनी संबंध पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (India-America Relation)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींना समुद्रात विसर्जन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ...
पश्चिम आशियातील बदलत्या समीकरणांची पार्श्वभूमी :
वन्स आणि मोदी यांच्यातील संवादाच्या काही दिवस आधी तुर्किये, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांनी परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या कराराकडे बदलत्या प्रादेशिक समीकरणांचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत भारत आणि अमेरिकेने संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, महत्त्वपूर्ण खनिजे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवण्यावर दिलेला भर आगामी काळातील दोन्ही देशांच्या धोरणात्मक संबंधांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. (India-America Relation)






