Nashik : नाशिकच्या रस्त्यांवरून राजकारण तापलं, राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

Nashik : नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नाशिक इतकं सुंदर केलं होतं, तर तुमचा एकही नगरसेवक पुन्हा निवडून का आला नाही ? असा थेट सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे.



...तर दोन चार नगरसेवक निवडून आले असते


राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. नाशिककरांनी आपलं सरकार पाहिलं. तुमचे महापौर पाहिले. जर खरंच शहराचा इतका विकास झाला असता, तर जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली असती. मात्र एकही नगरसेवक निवडून आला नाही. एवढं सुंदर नाशिक केलं होतं तर लोकांनी असा रिजल्ट का दिला? माझा त्यांना सवाल आहे. त्याचं उत्तर द्या. नाशिकमध्ये काहीही केलं नाही. नुसत्या गप्पा केल्या. सुंदर हरीत काहीही केलं नाही. नाशिक सुंदर केलं तर मग तुमचे दोन चार नगरसेवक निवडून आले असते. कुणालाच निवडून दिलं नाही. यावरून तुम्ही काय केलं हे दिसतं. लोकांना सर्वांना माहीत आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.



राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान


दरम्यान, गुजरातच्या कंत्राटदारांना नाशिकची कामे दिल्याचा राज ठाकरे यांनी केलेला आरोपही महाजन यांनी फेटाळून लावला. 'शहरातील सुरू असलेल्या सर्व कामांच्या कंत्राटदारांची यादी देतो. त्यात एक तरी गुजरातचा किंवा बाहेरच्या राज्यातील कंत्राटदार दाखवावा, असे खुले आव्हान त्यांनी दिले. नाशिकमध्ये सध्या सुमारे दीड हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, त्याचे ठेकेदार सांगावेत. आऊटर रिंगरोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार त्यांनी सांगावेत. त्याची यादी देतो. त्यातही गुजरातचे कोण ते सांगावे. घाटाची कामे सुरू आहे. सर्व यादी देतो. बाहेर राज्यातील ठेकेदार कोण आहे हे त्यांनी सांगावं. ऑनलाईन टेंडर कोणीही भरू शकतो. तरी सुद्धा बाहेरचे ठेकेदार कोण हे त्यांनी सांगावं, असं आव्हानच महाजन यांनी दिलं



यात भ्रष्टाचार कसा असेल ?


भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. पालिकेची अनेक कामे २० ते २२ टक्के कमी दराने, तर दुरुस्तीची कामे ३० टक्के कमी दराने मंजूर झाली आहेत. फायबर केबलची कामेही ४२ टक्के कमी दराने देण्यात आली आहेत. यात भ्रष्टाचार कसा असेल? आयआयटीसारख्या संस्थेमार्फत कामांचे परीक्षण केले जात आहे. विनाकारण राजकीय आरोप करू नयेत असे महाजन यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग