Tata Motors : टाटा मोटर्सची धमाकेदार 'नेक्सॉन कॅमो एडिशन' लाँच; किंमत ९.९९ लाखांपासून सुरू

भारतीय ऑटोमोबाइल बाजारात आपल्या सुरक्षित आणि आकर्षक एसयूव्हीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टाटा मोटर्सने (Tata Motors) लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'टाटा नेक्सॉन'ची नवीन आणि आकर्षक 'कॅमो एडिशन' (Camo Edition) भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केली आहे. कंपनीने या स्पेशल एडिशनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹ ९.९९ लाख ठेवली आहे. ही नवीन एडिशन ग्राहकांना पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अशा तिन्ही पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.



आकर्षक रंग आणि डिझाइनची नवीन ओळख


टाटा नेक्सॉनची ही कॅमो एडिशन प्रामुख्याने 'क्रिएटिव्ह' आणि 'फिअरलेस' या ट्रिम्सवर आधारित आहे. या नवीन मॉडेलमध्ये कंपनीने दोन आकर्षक आणि नवीन रंगांचे पर्याय दिले आहेत, ज्यामध्ये 'मुन्नार मिस्ट' (Munnar Mist) आणि 'कूर्ग क्लाउड्स' (Coorg Cloud) यांचा समावेश आहे. हे रंग यापूर्वी नुकत्याच लाँच झालेल्या टाटा सिएरामध्ये पाहायला मिळाले होते. तसेच, एसयूव्हीच्या पुढील फेंडर्सवर आणि हेडरेस्टवर खास 'कॅमो बॅजिंग' देण्यात आली आहे, जी याला रेग्युलर नेक्सॉनपेक्षा वेगळा आणि रुबाबदार लूक देते.



अतिआधुनिक फीचर्स आणि मोठा डिस्प्ले


या मॉडेलमधील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे यात मिळालेली १२.३ इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम ही आहे. याशिवाय यात १०.२५ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील जोडण्यात आला आहे. सुरक्षेच्या आणि प्रवासाच्या दृष्टीने यात इनबिल्ट डॅशकॅम (Dashcam) देण्यात आला आहे, जो चारही कॅमेऱ्यांच्या मदतीने सतत रेकॉर्डिंग करतो. यात १ GB चे अंतर्गत स्टोरेज असून यूएसबी पेनड्राइव्हद्वारे ते २५६ GB पर्यंत वाढवता येते.



इंजिन आणि ट्रान्समिशनचे पर्याय


टाटा नेक्सॉन कॅमो एडिशन टर्बो-पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंजिन पर्यायांसह खरेदी करता येणार आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT/DCT) ट्रान्समिशनचे पर्याय निवडता येतील. कंपनीच्या या नवीन एडिशनमुळे भारतीय ग्राहकांना स्टाइल, आधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार परफॉर्मन्सचा एक उत्तम अनुभव मिळणार असून, कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

TMC MPs notice : टीएमसीच्या २० बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची नोटीस

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया