WhatsApp Account Block : व्हॉट्सॲपने अनेक भारतीय वापरकर्त्यांची खाती तात्पुरती केली ब्लॉक

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने भारतीयांसह अनेक वापरकर्त्यांची खाती तात्पुरती ब्लॉक केल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक वापरकर्त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत, त्यांची खाती २४ तासांसाठी पुनरावलोकनाखाली ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे संबंधित वापरकर्त्यांना या कालावधीत व्हॉट्सॲप वापरता आले नाही.


सोमवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अनेक वापरकर्त्यांना व्हॉट्सॲपमध्ये अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर अॅपमध्ये "तुमच्या खात्याची तपासणी सुरू आहे" असा संदेश दिसू लागला. या संदेशात खात्यावरील हालचाली आणि डिव्हाइसची माहिती कंपनीच्या नियमांनुसार आहे की नाही, याची पडताळणी केली जात असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच २४ तासांच्या आत निर्णय कळवला जाईल, असेही सांगण्यात आले. (WhatsApp Account Block)



या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी संशयास्पद खात्यांवर नियमितपणे कारवाई केली जाते. इतर वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही खाती तात्पुरती ब्लॉक केली जातात. मात्र, काही वेळा चुकीनेही खाती निलंबित होऊ शकतात. अशा प्रकरणांची तपासणी करून पात्र खात्यांची सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत केली जाते, असे कंपनीने स्पष्ट केले. (WhatsApp Account Block)


दरम्यान, अनेक वापरकर्त्यांनी आपण केवळ अधिकृत व्हॉट्सॲप अॅपच वापरत असूनही खाते अचानक निलंबित झाल्याची तक्रार केली आहे. काहींनी आपले व्यावसायिक आणि वैयक्तिक कामकाज पूर्णपणे व्हॉट्सॲपवर अवलंबून असल्याने मोठा मनस्ताप झाल्याचेही सांगितले.


या घटनेमुळे व्हॉट्सॲपच्या स्वयंचलित तपासणी प्रणालीबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, कंपनीने प्रभावित वापरकर्त्यांना संयम बाळगण्याचे आणि पुनरावलोकन पूर्ण होण्याची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

D. K. Shivakumar : 'वंदे मातरम्'च्या पूर्ण गायनाला काँग्रेसचा विरोध, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दोन कडव्यांच्या निर्णयावर ठाम

बेंगळुरू: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण गायनाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला असून,

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न