D. Y. Patil : वडिलांच्या जाण्यानं पहाडासारखे खंबीर सतेज पाटील हळहळले

कोल्हापूर : लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणातून प्रगतीचा राजमार्ग खुला करणारे, समाजसेवेचे ध्यास घेतलेले... शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे आज म्हणजेच मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यात आणि शैक्षणिक विश्वात शोककळा पसरली. आधारवडाचे छत्र हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वडिलांच्या जाण्यानं पहाडासारखे खंबीर सतेज पाटील हळहळल्याचे काही जवळच्यांनी सांगितलं.



डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने संपूर्ण पाटील कुटुंबावर तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्यभर माणसं जोडत राहिलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी निःस्वार्थ भावनेने समाजसेवा केली. माणूस म्हणून कसे जगावे याचे संस्कार केले. त्यांचा प्रेमळ हात आणि मूल्यांची शिकवण हीच आमची खरी संपत्ती आहे अशी भावूक प्रतिक्रिया पाटील कुटुंबाने व्यक्त केली आहे.



कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात तसेच देशभरात शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात अथांग योगदान दिले. त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला.



माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर बुधवार ५ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पाटील कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत 'यशवंत निवास', कसबा बावडा, कोल्हापूर येथे डॉ. डी. वाय. पाटील यांचे अंत्यदर्शन घेता येईल. अंत्ययात्रा संध्याकाळी चार वाजता 'यशवंत निवास', कसबा बावडा येथून सुरू होणार आहे. नियोजनानुसार संध्याकाळी पाच वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Comments
Add Comment

Nashik Crime News : 'माझा नाद सोडून दे, माझे...', प्रेम नाकारल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

Nashik Crime News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि त्याच्या नवीन प्रेयसीच्या छळाला

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Ahilyanagar Crime : संतापजनक ! धावत्या एसटीत गुंडाची महिलेवर लघुशंका, पुढे...

Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे एका तळीराम गुंडाने माणुसकीची हद्द पार

Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या

Nashik : नाशिक विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची भरती

Nashik : आदिवासी विकास विभागांतर्गत (Department of Tribal Development) कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी