Nashik : नाशिकवरील जलसंकट टळले ! मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये उपयुक्त जलसाठा किती ?

Nashik : नाशिकमधील मुसळधार पावसाने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने नाशिकवरील जलसंकट (Water Crisis) टळल्याचे चित्र आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर नाशिकवर (Nashik) मोठे संकट घोंघावत होते. या दृष्टीने जून , जुलै मध्ये दर शनिवारी तर ऑगस्टमध्ये एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय नाशिक महापालिकांकडून (Nashik Municipal Corporation) घेण्यात आला होता. मात्र जुलै मध्ये झालेल्या पावसाने नाशिकच्या जलाशयांची आता सुस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम धरणामध्ये 2 ऑगस्ट रोजी तब्ब्लल ८८.०७ टक्के इतका विक्रमी उपयुक्त पाणी साठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे पाणी संकट तूर्तास टळले असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता नाशिकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.



पालखेड , दारणा समूह किती टक्क्यांवर ?


गंगापूर धरण समूहातील आळंदी, पालखेड धरण समूहातील वाघाड, ओझरखेड, तिसगाव तसेच इगतपुरीतील भावली, वालदेवी, भाम, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे १०० टक्के भरली आहेत.गंगापूर धरण ८४.२५ टक्के भरले असून मागील वर्षी या धरणात ८०.४४ टक्के इतका जलसाठा होता. त्याचबरोबर कश्यपी ९३.२० टक्के, गौतमी गोदावरी ९०.८५ टक्के, आळंदी १०० टक्के भरले आहे.


पालखेड धरण समूहातील पालखेड धरण ६६.९२ टक्के, करंजवण ८६.०९ टक्के, वाघाड १०० टक्के, ओझरखेड धरण १०० टक्के भरले आहे. तसेच ओझरखेड व तिसगाव धरणेही १०० टक्के भरले आहे. दारणा धरणामध्ये (Darna Dam) ६ हजार १४३ दलघफू (८५.९३ % ) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर भावली (Bhavali Dam) आणि वालदेवी धरण (Valdevi Dam) १०० टक्के भरली आहे. तर गिरणा खोऱ्यातील प्रकल्पांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. चणकापूर, हरणबारी, केळझर आणि गिरणाचे धरणे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली आहे. गिरणा धरणात १८ हजार १०१ दलघफू (९७.८४ %) पाणीसाठा जमा झाला असून गिरणा खोरे समूहात एकूण ९४.६० टक्के पाणीसाठा नोंदविला गेला आहे.



अमृतस्नानासाठी करावे लागणार नियोजन


नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी आणि गिरणा खोऱ्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वेगाने सुरु आहे. सात मोठे व १९ मध्यम प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ७० हजार ६१९ दलघफू एवढी असून, आज त्यामध्ये ६२ हजार १९१ दलघफू म्हणजेच ८८.०७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी ७५.२० टक्के पाणीसाठा होता, जो यंदा १२. ८७ टक्यांनी अधिक आहे. मात्र असे असले तरी पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाला आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) व अमृतस्नानाच्या पर्वणीसाठी सोडाव्या लागणाऱ्या पाण्याचा विचार करून नियोजन करावे लागणार आहे.

Comments
Add Comment

Bank Election : परभणी बँकेच्या सत्तेत मोठा उलटफेर! १४ वर्षांनंतर चित्र बदलले, दिग्गजांना मागे टाकत बोर्डीकर पुन्हा सत्ताधीश!

परभणी: राजकीय वर्तुळात अनेकदा "वेळ प्रत्येकाची येते" असे म्हटले जाते, आणि परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांचा बांकीपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय

बांकीपूर : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या पोटनिवडणुकीत जन

Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या घटनादुरुस्तीचे पुरावे सादर करा!

- केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुनेत्रा पवारांना पत्र; वैध प्रस्ताव अथवा ठराव अद्याप प्राप्त नाहीत मुंबई :

Akhilesh Reddy : मॅच फिक्सिंग प्रकरणात अमेरिकन क्रिकेटपटूला ICCचा दणका! अखिलेश रेड्डीवर तब्बल ८ वर्षांची बंदी

दुबई : क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कठोर भूमिका घेत असून, आता

Pune Rain : पुणेकरांनो सावध व्हा! मुठा नदीने धारण केले रौद्ररूप; धरण साखळी पूर्ण भरली, सखल भागात सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे शहर आणि परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम

NDA Mangal Milan : एनडीएची मंगल मिलन बैठक मंगळवार ४ ऑगस्ट रोजी होणार

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सोमवार ३ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. निवडक