Dattatray Bharne : अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांचे लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मोठा इशारा

मुंबई : "शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विकणे हा अन्यायकारक प्रकार असून, अशा लिंकिंगला राज्य शासनाने आधीच बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.



राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी आज सोशल मीडियाद्वारे कृषी सेवा केंद्र चालक युरियासोबत दुय्यम अथवा महागड्या खतांची सक्तीने विक्री करत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत असल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, या संदर्भात महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच अशा प्रकारच्या लिंकिंगला बंदी घालून कायदेशीर कारवाईचे स्पष्ट निर्देश जारी केले असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.



ते पुढे बोलताना म्हणाले, राज्यात अनुदानित खतांच्या विक्रीसोबत विना अनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैवखते, जैवउत्तेजके व इतर कृषी निविष्ठांची सक्तीने विक्री (टॅगिंग/लिंकिंग) होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन राज्य शासनाने २० मे २०२६ रोजीच शासन परिपत्रक काढून अशा प्रकाराला तात्काळ बंदी घातली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, पुरवठादार कंपन्या आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.



शेतकऱ्यांनी खतांच्या खरेदी व विक्रीदरम्यान कोणत्याही प्रकारचे टॅगिंग किंवा लिंकिंग होत असल्यास टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४००० किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९८२२४४६६५५ वर तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Eknath Shinde : पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना

पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर