Uddhav Thackeray : पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरून 'मातोश्री'त जोरदार राडा; दोन गट भिडले

उद्धव ठाकरेंसमोरच शाब्दिक बाचाबाची



मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी सोमवारी पार पडलेल्या बैठकीत कल्याण आणि ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळून आला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या मुद्द्यावरून दोन गट आमनेसामने आल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दोन्ही गटांत जोरदार शाब्दिक बाचाबाचीही झाली.


पक्षातील फुटीनंतर संघटन बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून विविध मतदारसंघांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 'मातोश्री'वर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर आणि माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.



बैठक सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या हकालपट्टीचा विषय ऐरणीवर आला. पक्षातील जुने पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त झालेले पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत मतभेद या वेळी चव्हाट्यावर आले. हकालपट्टीची कारवाई योग्य की अयोग्य यावरून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये वाद वाढला आणि बैठकीतच एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली.


हा प्रकार पाहून उद्धव ठाकरे अत्यंत संतापले. त्यांनी वाद घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना झापताना कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे उदाहरण दिले. "देशातील एक तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत आहे आणि तुम्ही इथे आपसात भांडत आहात? तुमच्या अशा वागण्याला काही अर्थ आहे का," असा सवाल करत ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र काम करण्याचा किंवा पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला.



लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा राजीनामा


दरम्यान, या बैठकीच्या काही वेळ आधीच पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. वैयक्तिक कारणांमुळे पक्षाला वेळ देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले असले तरी, कल्याणमधील या राजीनाम्यामुळे आणि मातोश्रीवरील राड्यामुळे ठाणे-कल्याण भागातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Eknath Shinde : पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना

पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर

Bhiwandi : भिवंडीत ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण, मारहाणीतील गंभीर जखमांमुळे ६५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू

भिवंडी : भिवंडीतील ठाणे रोड परिसरात, रोज घराबाहेर बसून धिंगाणा घालणाऱ्यांना हटकण्याची मोठी किंमत एका कुटंबाला

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ