Nashik : दर रविवारी पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट; प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी - मंत्री गिरीश महाजन

Nashik Mission Green Monsoon : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन आवश्यक आहे. केवळ वृक्ष लावून न थांबता ते जगविण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी. युवक व विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी केले.



हरित नाशिक समृद्ध नाशिकचा ६ टप्पा


मिशन ग्रीन मान्सून ( Mission Green Monsoon)अंतर्गत हरित नाशिक समृद्ध नाशिक ६ टप्पा अंतर्गत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मंत्री महाजन बोलत होते. मंत्री महाजन म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbh Mela) देश-विदेशातून सुमारे १० ते १२ कोटी भाविक येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंग, अनियमित पाऊस आणि उष्णतेच्या लाटा यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन (Tree Plantation and Conservation) गरजेचे आहे. वृक्ष लागवड, जंगलतोड रोखणे आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैली या बाबींचा स्वीकार केल्यास पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल. प्रत्येक नागरिकाने वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ( Nashik Mission Green Monsoon )



दर रविवारी पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट


जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) म्हणाले की, वृक्ष लागवड मोहीम सुमारे १८ आठवडे चालणार असून प्रत्येक रविवारी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या उपक्रमात विद्यापीठे, महाविद्यालये, कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक सहभागी होत आहेत. दर रविवारी किमान पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात किमान १४ झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा. प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.


यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर (Mayor Himgauri Adke-Aher), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) , महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ (Dr. Rajendra Bangal), व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मिलिंद आवारे (Dr. Milind Aware) आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी