Nashik Suicide News : बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या ! ‘सुसाईड नोट’ मध्ये...

Nashik Suicide News : नाशिकच्या पाथर्डी शिवारात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. पाथर्डी शिवारातील ‘गजरा नंदनवन’ इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका बारावीत शिकणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. आदिती सचिन दाहेदार असे या विद्यार्थिनीचे नाव असून, तिच्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. (Nashik Suicide News)



नेमकं काय घडलं ?


​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी नेहमीप्रमाणे क्लासवरून अदिती घरी परतली. मात्र यानंतर काही मिनिटांतच आदितीने बेडरूममधून खाली उडी मारली. क्लास संपल्यानंतर वडील सचिन दाहेदार तिला घरी घेऊन आले. हॉलमध्ये आई-वडील बोलत असताना आदिती बेडरूममध्ये गेली आणि तिने थेट सातव्या मजल्यावरून खाली झोकून दिले. (Nashik Suicide News)


इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) घटनास्थळी धाव घेत मोबाईल व सुसाईड नोट जप्त केली आहे. आदितीच्या पश्चात आई-वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ आणि हवालदार नंदू हारपडे तपास करत आहेत.



नाशिकमध्ये बनावट आयएसओचा बनाव


दरम्यान, दुसरीकडे नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आयएसओ मानांकन, जर्मनी व दिल्लीतील प्रदर्शनात सहभाग घेतल्याचे चित्र रंगवत तीन संशयितांनी नाशिक शहरात भाडेतत्त्वावरील जागेत कार्यालय थाटले. ही जागा आपल्या मालकीची असल्याच्या भूलथापा देत गुजरात आणि उत्तराखंड राज्यांतील औषधनिर्मिती कंपन्यांना भल्यामोठ्या ऑर्डर दिल्या. त्यापोटी पुढील तीन महिन्यांच्या तारखांचे धनादेश देऊन नव्याने ऑर्डर दिल्या आणि पहिल्या ऑर्डरचा धनादेश बँकेत वटण्यापूर्वीच संशयितांनी कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केले. यात गुजरात व उत्तराखंडमधील कंपन्यांची तब्बल एक कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये प्लाक्षा इंडस्ट्रीजचे ७७ लाख ५९ हजार ११६ रुपये आणि सहयोगी जीएनपालचे ९६ लाख ११ हजार २२७ रुपये, अशा एकूण एक कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपयांच्या मालाचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी