Nashik : खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेची युद्धपातळीवर मोहीम, सर्व विभागांत दुरुस्तीला वेग

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) अनुषंगाने सुरू असलेल्या विविध विकासकामांदरम्यान पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation ) विशेष मोहीम हाती घेतली आहे. सर्व विभागांमध्ये अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामांचा आढावा घेत आहेत. (Nashik News)



खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेची युद्धपातळीवर मोहीम


महापौर हिमगौरी आडके (Mayor Himgauri Adke) , उपमहापौर विलास शिंदे (Deputy Mayor Vilas Shinde) आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप (Standing Committee Chairman Machhindra Sanap) हे विविध भागांना भेटी देऊन नागरिकांच्या सूचना जाणून घेत आहेत. स्थानिक नगरसेवक, विभागीय अधिकारी आणि संबंधित कर्मचारी यांच्या माध्यमातून तातडीने दुरुस्तीची कामे केली जात आहेत. महापालिकेकडून खड्डे भरणे, रस्त्यांची डागडुजी, चेंबर दुरुस्ती, ओघळी भरणे, तसेच मिनरल मटेरियल, वेट मिक्स, मुरूम, जीएसबी आणि कोल्ड मिक्सच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. (Nashik News)



महापौरांकडून खड्डे दुरुस्तीच्या कामांची पाहणी


महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी गंगापूर रोडवरील खड्डे दुरुस्तीच्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रभागातील सर्व खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना दिल्या. शहरातील पश्चिम, पंचवटी, पूर्व, नवीन नाशिक, सातपूर आणि नाशिक रोड या सहाही विभागांमध्ये समांतरपणे कामे सुरू आहेत. एनडीए–पटेल रोड, अण्णाभाऊ साठे चौक, पी.एन.टी. कॉलनी, धात्रक फाटा–कॅनॉल रोड, निलगिरी बाग परिसर, पखाल रोड, रविशंकर मार्ग, अमृतवर्षा कॉलनी, शिवाजीनगर, कामोद नगर–सामनगाव रोड, भोर मळा, पाटोळे मळा, रेवगडे चाळ, गायकवाड पंप परिसर, प्रशांत नगर, दामोदर नगर, दुर्गा नगर, उत्तम नगर, योगेश्वर नगर, आंबड, जगताप नगर, भाग्यश्री नगर, विजय नगर आणि शिवशक्ती नगर आदी भागांत खड्डे दुरुस्ती सुरू आहे.महापालिकेने नागरिकांना विकासकामांच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (Nashik News)



मुंबईच्या धर्तीवर तंत्रज्ञान वापरा - आमदार देवयानी फरांदे


नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता नाशिक शहर युद्धपातळीवर खड्डेमुक्त करण्याच्या सूचना आमदार देवयानी फरांदे यांनी दिल्या. मुंबईच्या धर्तीवर ‘मिस्टिक ॲस्फाल्ट’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी महापौर हिमगौरी अडके-आहेर आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमवेत शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी करून खड्ड्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व खड्डे तातडीने भरून काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी खड्डे भरण्याची कामे शक्यतो रात्रीच्या वेळी करण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

High Court on FDA : हायकोर्टाच्या दणक्यानं मंत्रालयातील कँटिनचं रूप पालटलं; अन्न सुरक्षेच्या नियमांची कडक अंमलबजावणी!

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांनंतर आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईच्या धसक्याने

Solapur Accident : सोलापूरजवळ भीषण अपघात! पुणे-उमरगा एसटीला ट्रकची जोरदार धडक; चालकासह महिलेचा मृत्यू

शेळगी परिसरातील सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दुर्घटना; 10 प्रवासी गंभीर जखमी सोलापूर : सोलापूर-हैदराबाद (Solapur-Hyderabad)

Navnath Ban : संजय राऊत, राहुल गांधींची पळपुटे विरोधक म्हणून इतिहासात नोंद होणार

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली निर्भत्सना मुंबई : परीक्षा विधेयक मंजूर होत असताना राहुल गांधी,

Nashik Simhastha Kumbh Mela : साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी - डॉ. प्रवीण गेडाम

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या

Rat flees : दहा लाखांचा हिरा घेऊन उंदीर फरार; व्हिडीओ होतोय व्हायरल

कर्नाटक :कर्नाटकातील तुमकुरू येथे घडलेल्या एका अनोख्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका दागिन्याच्या

Cricketer Commits Suicide : नागपुरात १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या; संघात निवड न झाल्याची होती खंत

नागपूर: महाराष्ट्राच्या नागपूर शहरातून एक अतिशय मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये १७