Earthquake in Nashik : सहा दिवसांत १० भूकंप ! नाशिक जिल्ह्यात नेमकं काय घडतंय ?

Earthquake in Nashik : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यात मागील आठवड्यापासून सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. काही धक्के दिंडोरीसोबतच पेठ, कळवण आणि सुरगाणा तालुक्यांमध्येही जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना दिलासा दिला जात असतानाच गुरुवारी पहाटे सुरगाणा तालुक्यात पुन्हा दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे एकूण १० धक्के नोंदवले गेले आहेत. (Earthquake in Nashik)



नाशिक जिल्ह्यात नेमकं काय घडतंय ?


राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (National Center for Seismology) प्राथमिक अहवालानुसार, २५ जुलैपासून दिंडोरी परिसरात भूकंपाच्या सौम्य हालचाली सुरू आहेत. २९ जुलैपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत नऊ धक्क्यांची नोंद झाली होती. या धक्क्यांची तीव्रता २.८ ते ३.९ रिश्टर स्केलदरम्यान होती. यापैकी सात धक्क्यांची तीव्रता ३.० किंवा त्याहून अधिक होती. सर्वाधिक तीव्रतेचा ३.९ रिश्टर स्केलचा धक्का २८ जुलै रोजी दुपारी ३.२७ वाजता नोंदवण्यात आला. (Earthquake in Nashik)



आजवरचा सर्वात मोठा भूकंप १९८६ मध्ये


तज्ज्ञांच्या मते ही घटना भूकंप समूह (earthquake swarm) या प्रकारातील आहे. म्हणजेच कमी कालावधीत मोठा भूकंप न होता अनेक सौम्य धक्के बसण्याच्या प्रकारातील आहे. हे धक्के जमिनीपासून कमी खोलीवर होत असल्याने काही ठिकाणी गडगडाटासारखा आवाजही नागरिकांना ऐकू येऊ शकतो. नाशिक जिल्हा हा भारतीय मानक ब्युरोच्या (Bureau of Indian Standards) भूकंप विभागणी नकाशानुसार भूकंप क्षेत्र-३ (Seismic Zone III) मध्ये येतो. विशेष म्हणजे या भागात १९०० ते २०२६ या कालावधीत M 5.0 पेक्षा जास्त तीव्रतेचा मोठा भूकंप नोंदवला गेलेला नाही; आजवरचा सर्वात मोठा भूकंप २६ फेब्रुवारी १९८६ रोजीचा M 4.3 चा होता. (Earthquake in Nashik)



गुरुवारी सुरगाणा तालुक्यात पुन्हा धक्के


दरम्यान, गुरुवारी पहाटे सुरगाणा (Surgana) तालुक्यातील बोरगाव, भोरमाळ आणि काठुळा परिसरात पुन्हा दोन धक्के जाणवले. दिंडोरी (Dindori) तालुक्यातील काही गावांमध्येही हे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासन आणि भूकंप तज्ज्ञांनी (Seismologist) नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. सध्या जगात भूकंपाची वेळ, ठिकाण आणि तीव्रता अचूक सांगणारे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिक वेधशाळेसह (Nashik Observatory) राज्यातील सर्व भूकंप निरीक्षण केंद्रे (Earthquake monitoring centers) या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.



मात्र प्रशासनाकडून आश्वासन दिले जात असले तरी वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. हे धक्के नेमके कधी थांबणार, हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना सतावत आहे.

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,