Mumbai Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्गावर उभ्या ट्रकला क्रूझरची धडक; ८ जण गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी एक अत्यंत भीषण रस्ता अपघात घडला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नातेवाईकांना निरोप देऊन परतणाऱ्या एकाच कुटुंबाच्या ट्रॅक्स जिपची (क्रूझर) रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. पोगावजवळ घडलेल्या या अपघातात गाडीतील किमान आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद





या भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ट्रकला बसलेल्या भीषण धडकेत जिपच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघात घडताच आसपासच्या स्थानिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.


उमराहला जाणाऱ्या नातेवाईकांना निरोप देऊन परतताना काळरात्र


मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील चाळीसगाव परिसरातील एकाच कुटुंबातील सुमारे १० सदस्य आपल्या नातेवाईकांना उमराह यात्रेसाठी सौदी अरेबियाला निरोप देण्यासाठी मुंबई विमानतळावर गेले होते. तेथून परतत असताना पोगावजवळ त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला. "आम्ही चाळीसगाववरून नातेवाईकांना सोडण्यासाठी विमानतळावर आलो होतो आणि परत जाताना हा दुर्दैवी अपघात घडला," अशी माहिती जिप चालकाने दिली.

ओवरटेकिंगच्या प्रयत्नात भीषण अपघात


अपघाताचे कारण सांगताना चालकाने सांगितले की, "रात्रीची वेळ होती आणि रिमझिम पाऊस पडत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची वर्दळ होती. बाजूच्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकाचा अंदाज आला नाही आणि गाडी थेट त्यावर जाऊन धडकली."

८ जण जखमी, चौघांची प्रकृती चिंताजनक


अपघाताची बातमी समजताच स्थानिक रुग्णवाहिका आणि पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी चौघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान