Japan : जपान मध्ये कचरा टाकणे UPSC पेक्षाही कठीण; भारतीय महिलेचा अनुभव ,जपानची अनोखी व्यवस्था पाहून भारतीय महिला चक्रावली

जपान : स्वच्छतेबाबत जगभरात जपानचं नाव आदराने घेतलं जातं. तिथे स्वच्छता ही केवळ सरकारी मोहीम नसून प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. याच शिस्तीचा अनुभव सांगणारा जपानमध्ये(Japan) वास्तव्यास असलेल्या एका भारतीय महिलेचा व्हिडीओ(Video) सध्या सोशल मीडियावर(Social Media)मोठ्या प्रमाणात व्हायरल(viral) होत आहे. "जपानमध्ये कचरा टाकणं म्हणजे UPSC परीक्षा पास करण्याइतकंच कठीण आहे," असं ती गंमतीत म्हणताना दिसते.



महिलेच्या म्हणण्यानुसार, जपानमध्ये कोणताही कचरा मनमानी पद्धतीने टाकता येत नाही. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र वर्गीकरण, स्वतंत्र कचरापेटी आणि स्वतंत्र दिवस निश्चित केलेले असतात. त्यामुळे कोणती वस्तू कोणत्या दिवशी टाकायची, याची माहिती असणं प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक असतं.उदाहरणार्थ, प्लास्टिकची बाटली (Plastic Bottle) टाकण्यापूर्वी तिचं झाकण, प्लास्टिकचं लेबल(plastic Label) आणि झाकणाखालची प्लास्टिकची रिंग(Plastic Ring) वेगळी काढावी लागते. त्यानंतर बाटली स्वच्छ पाण्याने धुवून प्रत्येक भाग संबंधित कचरापेटीत टाकावा लागतो. या प्रक्रियेत चूक झाल्यास संबंधित व्यक्तीला दंडालाही(Fine) सामोरं जावं लागू शकतं.


भारतात(India) अजूनही अनेक ठिकाणी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याबाबत जनजागृती सुरू असताना, जपानमध्ये(Japan) कचरा व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे राबवलं जातं. त्यामुळे तिथले रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि परिसर कायम स्वच्छ दिसतात. भारतीय महिलेचा हा अनुभव सोशल मीडियावर(Social Media) चर्चेचा विषय ठरला असून, अनेकांनी जपानच्या शिस्तीचं कौतुक करत भारतातही अशीच प्रभावी कचरा व्यवस्थापन व्यवस्था असावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक