Shabana Azmi : 'बटवारा १९४७' च्या शूटिंगदरम्यान शबाना आझमी भावूक; सनी देओलने केली मदत

मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी त्यांच्या 'बटवारा १९४७' (Batwara 1947) या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात शूटिंगदरम्यानचा एक अत्यंत भावूक आणि कठीण अनुभव शेअर केला आहे. चित्रपटसृष्टीत तब्बल ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असूनही, या चित्रपटातील एका छळाच्या दृश्याचे शूटिंग करताना आपल्याला वैयक्तिक पातळीवर कमालीची मानहानी, हतबलता आणि अस्वस्थता जाणवल्याचे त्यांनी सांगितले.


चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या एका प्रसंगात खलनायक त्यांना ओढत नेऊन त्यांचा कुर्ता फाडतो. शबाना आझमी म्हणाल्या की, कलाकार म्हणून काम करताना पात्राच्या भावनांपासून स्वतःला वेगळे ठेवणे त्या क्षणी अशक्य झाले होते. एक स्त्री आणि माणूस म्हणून त्या प्रसंगात आपण अत्यंत असुरक्षित अनुभवत होतो आणि आपला स्वाभिमान दुखावला गेला होता, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


?si=9cuasloozMJQekAS

या कठीण प्रसंगात त्यांचे सहकलाकार सनी देओल (Sunny Deol) त्यांच्या मदतीला धावून आले. दृश्यादरम्यान सनी देओलने पुढे येऊन जेव्हा त्यांच्या अंगावर ओढणी टाकली, तेव्हा तो केवळ एक सहकलाकार न राहता रक्षकासारखा वाटला. शबाना यांनी अत्यंत भावूक होऊन सनीला मिठी मारली आणि देवाचे आभार मानले. ५० वर्षांच्या अभिनयानंतरही जर मी तो प्रसंग इतका खराखुरा अनुभवू शकले, तर त्याचे संपूर्ण श्रेय सनी देओलच्या उत्कृष्ट सहकार्याला जाते, असे म्हणत त्यांनी सनीचे विशेष आभार मानले. भारत आणि पाकिस्तान फाळणीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असलेला 'बटवारा १९४७' हा चित्रपट येत्या १४ ऑगस्ट रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटात शबाना आझमी आणि सनी देओल यांच्यासोबत करण देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Comments
Add Comment

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा