पुणे : 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' म्हणून देशभरात ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावावर बनावट पदवी प्रमाणपत्रे तयार करून देण्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार कोणत्याही यंत्रणेमुळे नव्हे, तर एका सामान्य रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.या प्रकरणाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.(SPPU)
- मराठी शिकवण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करणार मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा देदिप्यमान इतिहास आणि ...
महेश कदम हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात माहिती घेण्यासाठी ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात(SPPU) गेले असताना,वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर यांनी काही साथीदारांसह तब्बल तीन लाख रुपयांत बीकॉमची पदवी मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारानंतर कदम यांना बीकॉमचे पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.
मात्र, प्रमाणपत्रावर 'University of Pune' असे नाव असल्याचे पाहून कदम यांच्या मनात संशय निर्माण झाला. कारण विद्यापीठाचे अधिकृत नाव 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'(SPPU) आहे. त्यातच वेगवेगळ्या वर्षांची आणखी चार पदवी प्रमाणपत्रे (Degree Certificate) दाखवण्यात आल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याची त्यांची खात्री झाली.यानंतर महेश कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती विद्यापीठ प्रशासनाला दिली. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.तसेच कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली.
तक्रार दाखल करूनही सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, जवळपास महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने रमेश मुखेकर आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात खातेअंतर्गत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे विद्यापीठ(Univercity) प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या कथित प्रकरणामुळे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशीतून नेमके सत्य काय समोर येते याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक(education) क्षेत्राचे लक्ष लागले आहे .






