मुंबई : भारतीय चलन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ₹10 आणि ₹20 च्या प्लास्टिक (पॉलिमर) नोटांच्या (Plastic Currency Notes) चाचणीसाठी केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सुरुवातीला प्रत्येकी 100 कोटी (1 अब्ज) प्लास्टिक नोटा प्रायोगिक तत्त्वावर चलनात आणल्या जाणार असून, या नोटांची भारतीय हवामान आणि वापराच्या परिस्थितीत कार्यक्षमता तपासली जाणार आहे.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Minister of State for Finance Pankaj Chaudhary) यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. RBI ने पॉलिमर नोटांचा (Plastic Currency Notes) पायलट प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव दिला असून, चाचणी यशस्वी झाल्यानंतरच देशभरात त्यांचा व्यापक वापर करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
मुंबई : नवी मुंबईतील नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इंफ्लूएन्स नोटीफाईड एरिया) क्षेत्रातील गावांच्या नगर रचना योजनांना तातडीने मंजुरी द्यावी. तसेच मंजूर ...
प्लास्टिक नोटांचे फायदे काय?
RBI च्या मते, पॉलिमर नोटा पारंपरिक कागदी नोटांच्या तुलनेत अधिक टिकाऊ असतात. त्या लवकर फाटत नाहीत, ओलावा आणि घाण यांचा कमी परिणाम होतो तसेच बनावट नोटा तयार करणेही अधिक कठीण ठरते. त्यामुळे ज्या देशांमध्ये रोख व्यवहारांचे प्रमाण जास्त आहे, तेथे पॉलिमर नोटा अधिक प्रभावी मानल्या जातात. (Plastic Currency Notes)
कागदी नोटा बंद होणार का?
सरकारने याबाबत स्पष्ट केले आहे की, कागदी नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही. पॉलिमर नोटा या विद्यमान कागदी नोटांसोबतच चलनात राहतील. त्यामुळे नागरिकांनी कागदी नोटा बंद होणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. (Plastic Currency Notes)
नवी दिल्ली : संसदेच्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी लोकसभेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रसंग पाहायला मिळाला. 'सार्वजनिक ...
डिजिटल पेमेंटवर परिणाम होणार?
RBI ने सांगितले की, प्लास्टिक नोटांचा डिजिटल व्यवहारांवर काय परिणाम होईल, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढणे शक्य नाही. नोटा प्रत्यक्ष चलनात आल्यानंतरच त्याचा अभ्यास केला जाईल. केंद्रीय बँकेने स्पष्ट केले की, रोख व्यवहार आणि डिजिटल पेमेंट हे एकमेकांचे पर्याय नसून पूरक माध्यम आहेत. भविष्यातही दोन्ही प्रणाली एकत्रितपणे कार्यरत राहतील. (Plastic Currency Notes)






