Tuesday, July 28, 2026

Indian Railway : १ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार;रेल्वे स्थानकांवर नवी टोकन प्रणाली लागू

Indian Railway : १ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार;रेल्वे स्थानकांवर नवी टोकन प्रणाली लागू

मुंबई : भारतीय रेल्वेने तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1ऑगस्टपासून देशभरातील रेल्वे आरक्षण काउंटरवर तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवी टोकन प्रणाली लागू करण्यात येणार असून, त्यामुळे काउंटरवरील गर्दी आणि गोंधळ कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नव्या नियमानुसार,तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आरक्षण केंद्रावर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला सर्वप्रथम टोकन दिले जाईल.त्यानंतर टोकनवरील क्रमांकानुसार संबंधित प्रवाशाला तिकीट बुक करण्यासाठी बोलावले जाईल.त्यामुळे रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होईल आणि बुकिंग प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल. या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवाशांना सतत काउंटरसमोर थांबून राहावे लागणार नाही.टोकन मिळाल्यानंतर आपला क्रमांक येईपर्यंत ते आरामात प्रतीक्षा करू शकतील.यामुळे आरक्षण केंद्रांवरील गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि कर्मचाऱ्यांनाही तिकीट बुकिंग अधिक वेगाने करता येईल. यापूर्वी तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना प्रथम टोकन घेण्यासाठी एका काउंटरवर जावे लागत होते आणि त्यानंतर तिकीट काढण्यासाठी पुन्हा दुसऱ्या रांगेत उभे राहावे लागत होते.या दुहेरी प्रक्रियेमुळे वेळ वाया जात होता.नव्या व्यवस्थेमुळे ही गैरसोय दूर होणार असून,एकाच प्रक्रियेत बुकिंग अधिक सुलभ होईल. दरम्यान,तत्काळ तिकीट बुक करताना प्रवाशांनी आधार कार्ड किंवा अन्य कोणतेही वैध फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.तसेच प्रवाशांची नावे, वय आणि प्रवासाचा तपशील आधीच तयार ठेवल्यास बुकिंग प्रक्रिया अधिक जलद पूर्ण होण्यास मदत होईल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >