Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ


मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य वयात आणि योग्य वेळी समुपदेशन करणे ही काळाची गरज आहे. तरूणाईला व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठीची सुरूवात ही शाळा महाविद्यालयापासून करण्याच्या उद्देशाने मुंबईत 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची सुरूवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. येत्या ३० जुलै रोजी याचा  शुभारंभ करण्यात येणार आहे. ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानअंतर्गत मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी शपथ घेतील, यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने तयारी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त  आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. (Anti Drug Campaign)




मुंबईतील शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच तरूणाईला व्यसनाधिनतेपासून प्रतिबंध करण्यासाठी 'ड्रग्ज फ्री मुंबई' (Drug Free Mumbai) अभियान आयोजित करण्यात आले आहे. पालक - शिक्षक संघटना, सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, स्वयंसेवी संस्था यासारख्या संबंधित घटकांचा सक्रीय सहभाग अपेक्षित आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून ड्रग्ज फ्री मुंबई अभियानात अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात यावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त  आश्विनी भिडे यांनी दिले. अभियानाच्या समन्वयाच्या निमित्ताने मंगळवारी २८ जुलै २०२६ रोजी  मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.


कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियान कार्यक्रमाचे गुरूवारी ३० जुलै २०२६ आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ वरळी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उपमुख्यमंत्री  एकनाश शिंदे आणि उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार यांचीही या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे.




मुंबईतील महानगरपालिका तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थी या कार्यक्रमाचे निमित्ताने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील, यादृष्टीने शिक्षण विभागाने तयारी करावी. तसेच पालक शिक्षक संघटनांनाही ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाअंतर्गत घ्यावयाच्या शपथेबाबत अवगत करावे, अशाही सूचना  भिडे यांनी दिल्या. (mumbai)


मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील रूग्णालयाचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स, सामाजिक संस्था, एकूण १५० स्वयंसेवी संस्था तसेच गणेशोत्सव आणि नवरात्र मंडळे आदींचे पदाधिकारी या अभियानाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत.  ३० जुलै २०२६ वरळी येथे आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याठिकाणी ड्रग्ज फ्री मुंबई अभियानअंतर्गत हे विद्यार्थी शपथ घेतील. याप्रसंगी अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. (Public Safety)


ड्रग्ज फ्री अभियानाच्या निमित्ताने सार्वजनिक वाहतूक उपक्रमाचा भाग असेलल्या बेस्ट उपक्रम तसेच मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी अधिकाधिक प्रसिद्धी करण्याचे निर्देश  भिडे यांनी दिले. ऑनलाईन शपथ घेण्यासाठी drugfreemumbai.org या संकेेतस्थळावर नोंदणीचा पर्याय देण्यात आला आहे. संकेतस्थळावर तपशील भरून या अभियानाच्या निमित्ताने शपथ घेतल्यासाठीचे प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध होणार आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार