CWG 2026 : कॉमन वेल्थ गेम्समध्ये नाशिकच्या सर्वेशची चमक! उंच उडीत भारताला जिंकून दिले पहिले रौप्य पदक

ग्लासगो : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ ग्लासगो येथे खेळला जात आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत आतापर्यंत १० पदक जिंकले आहे. यात नाशिकच्या सर्वेश कुशारे याने उंच उडीत चमकदार कामगिरी करत रौप्यपदक जिंकले आहे. सर्वेश हा भारताच्या कॉमन वेल्थ गेम्स इतिहासात उंच उडीत रौप्य पदक जिंकणार पहिलाच खेळाडू ठरला आहे. (CWG 2026)



भारतासाठी पुरुषांच्या उंच उडीमध्ये चार वर्षांपूर्वी तेजस्विन शंकरने पदक जिंकले होते. त्याने बर्मिंघम २०२२ कॉमन वेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते. सर्वेशने २.२५ मीटर उडी मारत रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्याने आपल्या कॉमन वेल्थ गेम्स स्पर्धेच्या पदार्पण करत रौप्य पदक जिंकले आहे.यामुळे भारताच्या पदकांमध्ये वाढ झाली आहे. भारताने आतापर्यंत २ सुवर्णपदके,५ रौप्यपदके,३ कांस्यपदके अशी एकूण १० पदके जिंकली असून, भारतीय खेळाडूंची विजयी घोडदौड कायम आहे. भारतीय खेळाडूंच्या या दमदार कामगिरीमुळे कॉमन वेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताच्या आणखी पदकांच्या आशा वाढल्या असून, आगामी स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(CWG 2026)




इंडियन आर्मीमध्ये सुभेदार


सर्वेश कुशारेचा जन्म १७ जून १९९५ रोजी नाशिक जिल्ह्यातील देवगावमध्ये झाला. त्याला शाळेत असताचं उंच उडीची आवड होती. सर्वेश २०१६ मध्ये इंडियन आर्मीमध्ये दाखल झाला. त्याला नायब सुभेदार नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या उंच उडीची आवड कायम ठेवत, वेग-वेगळ्या स्पर्धेत भाग घेतला.







स्टेट रेकॉर्ड होल्डर सर्वेश


सर्वेश कुशारेने २०१९ च्या एशियन गेम्स स्पर्धेत उंच उडीचे सुवर्ण पदक जिंकले. तर २०२३ च्या एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्याने मागच्या महिन्यात २.३१ मीटरची उडी मारत तेजस्विन शंकराचे आठ वर्षापूर्वीचे राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत डायमंड लीगमध्ये २.२६ मीटरची उडी मारत तिसरे स्थान पटकावले. आता त्याने आपल्या पहिल्याच कॉमन वेल्थ गेम्स स्पर्धेमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय

Ind vs SL Test Match : श्रीलंकेवर फॉलोऑनची टांगती तलवार : लंकेच्या ४६२ धावांत ५ गडी बाद; टीम इंडियाच्या विजयात पावसाचा अडथळा?

Ind vs SL Test Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या निवृत्तीचे संकेत; २०२६-२७ हंगाम ठरू शकतो अखेरचा!

मुंबई : फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लवकरच आपल्या २५ वर्षांच्या

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान