Nashik : बंदिस्त पुरचारी ही जलसंधारण विभागाची पहिली योजना असून, अशा योजनांमुळे पाणी शेवटच्या घटकापर्यंत अतिशय कमी वेळेत पोहोचते. त्यामुळे भविष्यात अशा योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच ही योजना भविष्यात लाभधारकांकडून हाताळता यावी, यासाठी अभ्यासपूर्वक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे (Soil and Water Conservation Department) सचिव जितेंद्र पापळकर यांनी विभागाला दिले.
नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील खासदारांसोबत आढावा बैठक घेतली. तसेच, ...
सिन्नर तालुक्यातील पुरचाऱ्यांची पाहणी
शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर (Jitendra Papalkar) आणि मुख्य अभियंता हरिभाऊ गिते (Chief Engineer Haribhau Gite) यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी ते सायाळे व खोपडी ते मिरगाव या पुरचाऱ्यांची तसेच को. प. बंधारा, देवपूर (कंभळाचे झाड) या कामाची क्षेत्रीय पाहणी केली . संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान जलसंधारणाच्या कामांमुळे झालेला सकारात्मक परिणाम, कामांची गुणवत्ता तसेच नियोजनबद्ध अंमलबजावणी याबाबत सचिव पापळकर यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही याच दर्जाची गुणवत्तापूर्ण कामे करून जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिन खंबाईत, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे तसेच कंत्राटदार किरण पाटील उपस्थित होते. पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी विविध कामांची माहिती सादर केली व जलसंधारणाच्या माध्यमातून परिसरात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. जलसंधारणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा क्षेत्रीय पाहण्या मार्गदर्शक ठरत असून, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख कामांना अधिक चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, मालदेवतामध्ये २३३ मिमी पावसाची शक्यता देहरादून : उत्तराखंडमध्ये सक्रिय मान्सूनमुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ...
कुंदेवाडी ते सायाळे पुरचारी
१) लांबी – ३६ किलोमीटर
२) आरक्षित पाणी – १०५ दशलक्ष घनफूट
३) सिंचन लाभक्षेत्र – २४८ हेक्टर
४) लाभार्थी विहिरी – ४००
गावे : कुंदेवाडी, गुरेवाडी, हबेवाडी, मुसळगाव, गोंदे, दातली, खंबाळे, मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक, सुरेगाव, भोकणी, दोडी, मानोरी, कणकोरी, निऱ्हाळे, फुलेनगर, घोटेवाडी, कहांडळवाडी, सायाळे आणि चोरकौठे.
Nashik Crime News : सायबर गुन्हेगार आता केवळ ओटीपी किंवा लिंक पाठवूनच नाही, तर कंपनीच्या सीईओचं बनावट प्रोफाइल तयार करूनही लाखोंची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत ...
खोपडी ते मिरगाव पुरचारी
१) लांबी – २५ किलोमीटर
२) आरक्षित पाणी – ११७ दशलक्ष घनफूट
३) सिंचन लाभक्षेत्र – २५० हेक्टर
४) लाभार्थी विहिरी – २५०
गावे : खोपडी बु., फर्दापूर, धारणगाव, देवपूर, पंचाळे, शिंदेवाडी, पांगरी, पिंपळगाव, शहा, मिठसागरे, पिंपरवाडी, मिरगाव आणि कोळगावमाळ.






