Traffic Congestion : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी,तीन प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांच्या नियोजन, वित्तीय व्यवस्थापन, अंमलबजावणी, देखरेखीसाठी गठित उच्चस्तरीय समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath Shinde) उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अति पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी व अति पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पांची माहिती दिली.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उच्चक्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग (HCMTR) हा पुण्याच्या भविष्यातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा एक परिवर्तनकारी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. एचसीएमटीआर व बोगदा प्रकल्प हे पुणे शहराला अधिक कार्यक्षम, वाहतूक सुलभ व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. या तीनही प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका व पुणे महानगर विकास प्राधिकरण यांना देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावे. तसेच रिंगरोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला देण्यात यावी.



पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ४३.६० किमी अंतराच्या या प्रकल्पामुळे २५ ते ३० टक्के वाहतूक कमी होणार आहे. यामुळे सर्व मेट्रोमार्गिका जोडल्या जाणार असून रस्त्याची वाहतूक क्षमता वाढणार आहे. त्यामुळे एचसीएमटीआर या प्रकल्पाचे काम लवकर सुरू करुन २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. यासाठीचे आर्थिक मॉडेल तयार करून प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. पीएमआरडीएद्वारे राबविण्यात येणारा अंतर्गत रिंग रोड हा प्रकल्प ८३.१२ किमीचा असून यामध्ये ४४ गावांचा समावेश आहे. या अंतर्गत रिंग रोडचे काम पाच टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाची प्रक्रिया येत्या सहा ते सात महिन्यांत पूर्ण करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. रोख मोबदला देऊन रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.



पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाताळलोक प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरात तीन ठिकाणी बोगदे तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये भोसरी ते उंड्री – नवीन विमानतळ (३६ किमी यामध्ये १० किमी एलिव्हेटेड), रामनदी- भूगाव ते राजाराम पूल (८ किमी) आणि तळजाई टेकडी ते पद्मावती-हिंगणे (१.६५ किमी) या बोगद्यांचे प्रस्तावित आहे. या बोगद्यांच्या जाळ्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची अथवा तज्ज्ञांची मदत घेऊन सर्वंकष सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पीएमआरडीएच्या प्रस्तावित नगररचना (TPS) योजनासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. पीएमआरडीए व पुणे महापालिकेच्या १५ नगर रचना योजना प्रस्तावित असून या योजना रद्द करण्यासंदर्भात पीएमआरडीएने आपल्या स्तरावर प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.





  • उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर) वैशिष्ट्ये

  • · एकूण अंदाजे ३६ किमी लांबीचा सहा पदरी उन्नत मार्ग

  • · पुणे शहरातील मध्यवर्ती नागरी भागातून जाणार

  • · प्रकल्पाचा अपेक्षित खर्च – बांधकाम खर्च सुमारे ९ हजार कोटी, भूसंपादनासाठी खर्च सुमारे ३ हजार कोटी

  • · सार्वजनिक वाहतुकीशी एकात्मीकरण करणार

  • · एचसीएमटीआरमधील पॅकेज - बोपोडी ते सिंहगड रस्ता (१०.५ किमी), सिंहगड रोड ते सोलापूर रोड (१३.२ किमी), सोलापूर रोड ते एअरपोर्ट चौक (१०.२१ किमी), एअरपोर्ट चौक ते बोपोडी (९.१७ किमी).




  • पीएमआरडीएच्या अंतर्गत रिंगरोडची वैशिष्ट्ये

  • · प्रकल्पाचा एकूण खर्च २५,१५९.८८ कोटी

  • · प्रकल्पाचे टप्पे – टप्पा १ - सोळू इंटरचेंज ते वडगाव शिंदे (मनपा हद्द) (४.७० किमी लांबी), लोहगाव (मनपा हद्दीपासून) ते वाघोली (७.५६ किमी).

  • · टप्पा २ – वाघोली ते कदमवाक वस्ती (९.३६ किमी लांबी)

  • · टप्पा ३ – कदमवाक वस्ती ते जांभूळवाडी (२१.४८ किमी)

  • · टप्पा ४ – जांभूळवाडी ते भूगाव (१४.२१ किमी)

  • · टप्पा ५ – भूगाव ते परंदवाडी (२५.८० किमी)

Comments
Add Comment

Ghatkopar School : घाटकोपर येथील टिळकमार्ग महानगरपालिका शाळा इमारत झाली खुली

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका एन विभागांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथे टिळकमार्ग येथे नव्याने

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)