Water Cut Mumbai : येत्या मंगळवारी आणि बुधवारी संपूर्ण मुंबईतील काही भागांमध्ये तांत्रिक पाणीकपात

आधीच १० टक्के पाणीकपात, त्यात आणखी १५ टक्के कपातीचा सामना करावा लागणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत (BMC Water Supply) पांजरापूर येथील मुंबई - ३ अ उदंचन केंद्रातील विद्यमान ६.६ के.व्ही. उच्च दाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, मंगळवारी २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते बुधवारी २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या २० तासांच्‍या कालावधीत भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पांजरापूर येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही भागास पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात होऊ शकते. नागरिकांनी याची दखल घेऊन सहकार्य करावे, असे नम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात असले तरी आधीच दहा टक्के त्यात या दोन दिवसांमध्ये १५ टक्के अशाप्रकारे तब्बल २५ टक्के कपातीचा सामना करावा लागणार आहे. (Mumbai Water Cut)



पांजरापूर येथील मुंबई - ३ अ उदंचन केंद्रातील ६.६ के.व्ही. उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे नियोजन आहे. या अंतर्गत विद्यमान १० जुन्या उच्चदाब नियंत्रण पॅनेलच्या जागी अत्याधुनिक व कार्यक्षम अशा १० नवीन उच्च दाब नियंत्रण पॅनेलची स्थापना करण्यात येणार आहे. पहिल्‍या टप्प्या अंतर्गत एकूण १० उच्चदाब कंट्रोल पॅनलपैकी ४ उच्चदाब कंट्रोल पॅनल प्रथम बदलण्यात येणार आहेत. हे काम मंगळवारी २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते बुधवारी २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ‘मुंबई ३ अ उदंचन केंद्र’ सुमारे २० तास बंद ठेवणे अपरिहार्य आहे. (Mumbai)


परिणामी, येत्या २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते दिनांक २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत या २० तासांच्‍या कालावधीत भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पांजरापूर येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही ठिकाणच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात होऊ शकते. (Water Shortage)

Comments
Add Comment

Ghatkopar School : घाटकोपर येथील टिळकमार्ग महानगरपालिका शाळा इमारत झाली खुली

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका एन विभागांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथे टिळकमार्ग येथे नव्याने

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)