RAW : 'रॉ' अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला 'रॉ'(RAW)अधिकारी असल्याचे भासवत खाते सुरू करून देण्यासाठी सव्वा चार लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या परेश प्रवीण कोठारी(वय ४२,रा.सातारा रस्ता,पुणे)याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली.या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



तक्रारदाराच्या खात्यात वेगवेगळ्या खात्यांतून चार हजार रुपये जमा झाल्यानंतर बँक खाते गोठविण्यात आले.चौकशीत हे व्यवहार पुण्यातील खात्यांतून झाल्याचे समोर आले.त्यानंतर संशयिताने व्हॉट्सॲप कॉलद्वारे(WHATSAPPCALL) संपर्क साधत स्वतःला 'रॉ'अधिकारी असल्याचे सांगितले आणि खाते सुरू करण्यासाठी सुरुवातीला पाच लाख,नंतर तडजोडीनंतर सव्वा चार लाख रुपयांची मागणी केली.पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,अशी धमकीही दिली.

तक्रारदाराने वकिलांच्या सल्ल्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.सातारा रस्त्यावरील पंचमी चौक परिसरात खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या परेश कोठारीला रंगेहात अटक करण्यात आली असून पुढील तपास पर्वती पोलीस करत आहेत.
Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र