Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत शालेय बस आणि व्हॅनसाठी नवीन नियम लागू केले आहेत.१६ जुलै रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या या नियमांमुळे विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित,शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे.प्रथमच शालेय वाहतुकीच्या भाडे निर्धारणाचे अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांकडे (RTO)देण्यात आले असून,पालकांची आर्थिक फसवणूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



नव्या नियमांनुसार प्रत्येक शालेय वाहनात सीसीटीव्ही(CCTV),जीपीएस(GPS),सीट बेल्ट,पॅनिक बटण,डिजिटल(DIGITAL) हजेरी प्रणाली आणि व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा अनिवार्य करण्यात आली आहे.त्यामुळे पालकांना मोबाईल(MOBILE) अॅपद्वारे मुलांच्या प्रवासावर लक्ष ठेवता येणार आहे.तसेच सीसीटीव्ही फुटेज ३० दिवस जतन करणे बंधनकारक असेल.वाहनचालक आणि मदतनिसांसाठी पोलिस पडताळणी,वैद्यकीय प्रमाणपत्र आणि शारीरिक तंदुरुस्तीची अटही लागू करण्यात आली आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही शासनाने दिला आहे.


नव्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होणार असून शालेय वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र