मुंबई : भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार ठरत असलेल्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आणखी एक ऐतिहासिक पराक्रम आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून अवघ्या २२ दिवसांतच त्याने सचिन तेंडुलकरचा तब्बल ३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध चमकला वैभव :
झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात वैभवने (Vaibhav Suryavanshi) ८१ धावांची तुफानी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण मालिकेत त्याने दमदार फलंदाजी करत तीन डावांत केवळ ७७ चेंडूंमध्ये १५१ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल १९६.१० इतका होता. या मालिकेत त्याने दोन अर्धशतके, १५ चौकार आणि ९ षटकार ठोकत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
भारताचा युवा वेगवान (Fast Bowler) गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) दुखापतीतून (Injury) पुनरागमन (Comeback) केल्यानंतर दमदार लयीत दिसत आहे. झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) तिसऱ्या टी-२० ...
सचिनचा विक्रम इतिहासजमा :
१५ वर्षे १२१ दिवस वय असताना वैभवला (Vaibhav Suryavanshi) 'प्लेयर ऑफ द मॅच' (Man Of The Match) आणि 'प्लेयर ऑफ द सीरिज' (Player of the Series) हे दोन्ही पुरस्कार मिळाले. यामुळे तो भारताकडून सर्वात कमी वयात हे दोन्ही मानाचे पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर होता. सचिनला १९९० मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीत १७ वर्षे ११२ दिवस वयात पहिला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला होता. आता वैभवने (Vaibhav Suryavanshi) हा ३४ वर्षांपासून कायम असलेला विक्रम मोडीत काढला आहे.
टीकेला मैदानातच दिले उत्तर :
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अपेक्षित कामगिरी न झाल्याने वैभवच्या (Vaibhav Suryavanshi) निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत त्याने धडाकेबाज फलंदाजी करत टीकाकारांना चोख उत्तर दिले.
भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ३५ ...
टी-20 क्रिकेटमध्ये नवा 'यंगेस्ट स्टार' :
वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात 'मॅन ऑफ द मॅच' (Man Of The Match) ठरणारा खेळाडू बनला आहे. भारतासाठी सर्वात कमी वयात 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, युवराज सिंग आणि पृथ्वी शॉ यांच्यासारख्या दिग्गजांनाही त्याने मागे टाकले आहे. वैभवची ही कामगिरी भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी अत्यंत आशादायी मानली जात असून, अल्पावधीतच त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Vaibhav Suryavanshi)




