मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ (Commonwealth Games 2026) मध्ये भारताच्या वेटलिफ्टिंग संघाने (Weightlifting) दमदार कामगिरी कायम ठेवत आणखी एक पदक जिंकले आहे. पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात भारताच्या राजा मुथुपंडीने (Raja Muthupandi) रौप्यपदकाची (silver medal) कमाई करत देशाच्या खात्यात दिवसातील तिसरे पदक जमा केले. त्याच्या या यशाने भारतीय वेटलिफ्टिंग संघाची विजयी घोडदौड कायम राहिली.
२६ वर्षीय राजा मुथुपंडीने (Raja Muthupandi) स्पर्धेत एकूण २८६ किलो वजन उचलत (स्नॅच – १२६ किलो, क्लीन अँड जर्क – १६० किलो) दुसरे स्थान पटकावले. मलेशियाच्या अझनील बिन बिदिन मोहम्मद यांनी तब्बल २९९ किलो वजन उचलून कॉमनवेल्थ गेम्स विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. यासह त्यांनी सलग तिसऱ्यांदा कॉमनवेल्थ गेम्सचे सुवर्णपदक आपल्या नावावर केले. (Commonwealth Games 2026)
ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला ४८ किलो वजनी गटात ...
दुखापतीवर मात करून गाठले यश :
राजा मुथुपंडीचा (Raja Muthupandi) हा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. २०१९ मध्ये कोपराच्या लिगामेंटला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचे करिअर संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली होती. त्यानंतर कोविड-१९ महामारीमुळे पुनर्वसन प्रक्रियेलाही मोठा फटका बसला. याच काळात जास्त वजनाच्या गटात जेरेमी लालरिनुंगाच्या उदयानंतर राजा २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्ससाठी पात्र ठरू शकला नव्हता. (Commonwealth Games 2026)
मात्र, ६५ किलो वजनी गट सुरू झाल्यानंतर त्याने (Weightlifting) राष्ट्रीय संघात दमदार पुनरागमन केले. २०२५ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २९९ किलोचा वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम करत नववे स्थान मिळवले होते. त्याच कामगिरीचा आत्मविश्वास त्याने ग्लासगोमध्येही कायम ठेवला.
भारताचा वेटलिफ्टिंगमध्ये दबदबा :
राजाच्या रौप्यपदकापूर्वी भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू हिने महिलांच्या ४८ किलो गटात सलग तिसरे कॉमनवेल्थ सुवर्णपदक पटकावले. तर चनंबम ऋषिकांत सिंह याने पुरुषांच्या ६० किलो गटात रौप्यपदक जिंकले. यामुळे दिवसातील भारताची तिन्ही पदके वेटलिफ्टिंगमधूनच (Weightlifting) आली असून, या खेळातील भारताचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. (Commonwealth Games 2026)
View this post on Instagram
ग्लासगो : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपले दुसरे पदक मिळवले. ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत ...
बॉक्सिंगमध्ये मात्र भारताला धक्का :
दरम्यान, भारताच्या बॉक्सिंग (Boxing) मोहिमेला पहिला धक्का बसला. आदित्य प्रताप यादव याचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये युगांडाच्या नूहू बाटे याच्याकडून 3-2 अशा स्प्लिट निर्णयाने पराभव झाला. ग्लासगो २०२६ स्पर्धेतील बॉक्सिंगमधील भारताचा हा पहिलाच पराभव ठरला. (Commonwealth Games 2026)




